बिनबा गेट-चोराळा-देवाडा-सोनुर्ली-चिंचाळा या पांदण रस्त्याचे काम नित्कृष्ठ दर्जाचे - सुनिल इग्रपवार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर तालुक्यात येत असलेल्या बिनबा गेट- चोराळा- देवळा- सोनुर्ली- चिंचाळा या पानंद रस्त्याचे काम जिल्हा परिषदेच्या उप बांधकाम विभागाकडून जिल्हा वार्षिक निधी अंतर्गत रस्त्याचे काम करण्यात आले.
(1) प्ररामा-14 रस्ता ईजिमा-111 रस्ता बांधकाम CH.8/00 ते 15/00 तालुका चंद्रपूर
निधी :- जिल्हा वार्षीक 30-54/3522/सन 2025-26
(2) बिनबा गेट-चोराळा-देवाडा-सोनुर्ली-चिंचाळा to SH. 14 Road, ODR 101 ATCH-5/00 to 7/00 Providing WBM Road And C/o. CD Work
निधी :- DPC Gen. 50542286/2024-25
याप्रमाणे रस्ता (खडीकरण) चे बांधकाम काही महिण्यापूर्वी करण्यात आलेले होते. परंतु सदर रस्ता हा सद्यास्थितीत खराब अवस्थेत आहे (त्यांचे छायाचित्र उपलब्ध आहे). सदर रस्त्याचे बांधकाम बरोबर झाले नसल्यामुळे काही ठिकाणी त्या रस्त्याच्या आजुबाजुला मोठ-मोठे खड्डे व रस्त्याच्या बाजुचा मातीचा थर हा पूर्णपणे खचलेला पासून काही ठिकाणी रस्ता वाहत गेला आहे. त्यामुळे संबंधीत शेतक-यांना आपल्या शेतात बैलबंडीने ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शेतक-यांना मानसीक त्रास जाणवत आहे. त्या रस्त्यानी बैलबंडी ये-जा करतांना जिवीतहानी होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. म्हणून संबंधित कामाची गुणवत्ता, मोजमा पुस्तके नुसार करावी, तसेच या
बांधकाम झालेल्या या रस्त्याची प्रत्यक्षात चौकशी करुन संबंधीत अधिकारी व कंत्राटदार दोषी आढळल्यास यांच्यावर उचित कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुनिल इग्रपवार यांनी जिल्हा परिषदच्या कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केले आहे.
संबंधित तक्रारीची माहिती, पालकमंत्री, जिल्हाधिकारी,
चंद्रपूर जिल्ह्याचे आमदार यांना सुद्धा देण्यात आले आहे.
