जुनोना मार्गावर हुल्लटबाजीत स्प्लेंडर हायवावर धडकली , युवकाचे पाय गमावण्याची शक्यता?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
80 वा स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण झाल्यानंतर, अनेक युवक, युवती आपल्या प्रेम युगाला सोबत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जवळच जंगल व्याप्त निसर्गमय वातावरण असलेल्या जुनूना तलाव,जंगलात फिरण्याचा आनंद लुटण्यासाठी जात असतात. शेकडो युवक,युवती जुनूना जंगलातील रस्त्यावर हुल्ड बाजी करताना आढळून आले.
गाड्या रस्त्याच्या कडेला लावून बिनधास्त मध प्राशन करताना दिसून येत होते. मात्र अशाच हुल्लटबाजी
मध्ये नसेत असलेल्या एका युवकाने आपली वेगात असलेली स्प्लेंडर हायवर धडकवली असे स्थानिक नागरिकांनी प्रत्यक्ष दर्शनी पाहणार-यानी सांगितले. यात दोन युवक गंभीर जखमी झाले असून त्यांचे दोन्ही पाय निकामी होण्याची शक्यता असल्याची प्रत्यक्ष दर्शनी पाहणाऱ्यांनी सांगितली. अपघात झालेल्या स्प्लेंडर ची
स्थिती पाहता अपघात किती भयानक झाला असेल या टू व्हीलर वरून दिसून येते.
सुरक्षा व्यवस्थेच्या दृष्टिकोनातून वाहतूक पोलीस या ठिकाणी असताना सुद्धा, नाबालिक युवक, युवती सर्रास आपले वाहने डबल सीट कोणी ट्रिपल सीट अशा हुल्लटबाजी मध्ये रस्त्यावर चालवत असल्याचे दिसून आले. त्या वाहनधारकावर वाहतूक पोलिसांनी कार्यवाही केल्याचे सांगितले. अपघात झालेल्या युवकांना ॲम्बुलन्स द्वारे तात्काळ शासकीय हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले. अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. पुढील तपास बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक करीत आहेत.
