मे. लॉयटस् मेटल्स अॅन्ड ऐलर्जी लिमिटेडच्या रासायनिक घाण प्रदूषणामुळे शेकडो शेतकऱ्याचे नुकसान
..या तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदान करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
मे. लॉयटस् मेटल्स अॅन्ड ऐलर्जी लिमिटेड घुग्घुस जि. चंद्रपूर द्वारा जुना बंधारा बंद करून नविन बंधारा तयार करून रासायनिक घान कचरा व रासायनिक द्रव्य नाल्यात सोडत असल्यामुळे शेतजमिन व शेतपिकाला नुकसान व प्रदूषित होत असल्यामुळे दि. २५/०८/२०२६ मंगळवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर नुकसान ग्रस्त शेतकरी आत्मदान करणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेतून दिली.
मौजा उसगाव येथे शेत जमिन असून यांच्या भूमापन क. २५३, २५२, १८४, २५३, २६३, २५५, १७४/२, २६२, २६०, २५०, २५१, ४४४, १८५ जवळपास १०० एकर शेतजमिन मे. लॉयटस् मेटल्स अॅन्ड ऐलर्जी लिमिटेड या कारखान्याचा रासायनिक घान कचरा व रासायनिक द्रव्य व जडवाहतूक मुळे होणाऱ्या घातक वायू प्रदूषणामुळे शेत जमिन व शेतीतिल पिक प्रदूषित होत आहे. त्यामुळे सुपिक शेत जमिन नष्ट होण्याचा मार्गावरती जात आहे. नाल्यातील प्राळिव प्राणि जलचर प्राणि वन्यजिव पक्षी हे नाल्यातील पाणी पित होते कारखान्याद्वारे रासायनिक द्रव्य व रासायनिक घान कचरा सोडत असल्यामुळे, नाल्यातील पाणि प्रदूषित झालेले आहे. त्यामुळे कोणीही पाणी पित नाही व शेतीला वापरण्यात येत नाही. आणि नाल्यातील पाणी समोर जाउन वर्धा नदी मध्ये मिश्रीत होत आहे. त्यामुळे लाखो नागरीकांच्या आरोग्याला व जिवाला धोका निर्माण झाला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालय प्रादेशिक अधिकारी श्री. तानाजी यादव व उपप्रादेशिक अधिकारी सुशिल कुमार राठोड मे. लॉयटस् मेटल्स अॅन्ड ऐलर्जी लिमिटेड यांच्या सोबत साडघाट करून कारखान्याचा व्यवस्थापक यांच्या कडून मोठया प्रमाणात लाज घेऊन नियमाचे उल्घंन करित आहे. त्यामुळे हा अधिकाऱ्यावरती कायदेशिर कार्यवाही करून कारखान्याद्वारे होणाऱ्या रासायनिक व वायू प्रदूषणातून आम्हा सगळ्या शेतकऱ्यांना न्याय देण्याच काम करावे.
मे. लॉयटस् मेटल्स अॅन्ड ऐलर्जी लिमिटेड या लोहखनिज प्रकल्पावरती कायदेशिर कार्यवाही करून आमचे जे नूकसान वषो न वर्ष होत आहे. त्याची आम्हाला नुकसान भरपाई देण्यात यावी. आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही सगळे शेतकरी व परिवार आत्मदान करणार,
आम्हाला ४८ तासांत न्याय देण्यात यावे. अन्यता आम्ही सगळे जन आपले जिल्हयाचे प्रथम न्यायाधिश असल्यामुळे आम्हाला आपल्याकडून न्याय न मिळाल्यामुळे आम्ही सगळे शेतकरी सहपरिवारा सह आपला कार्यालयात आत्मदान समोर दि. २५/०८/२०२६ मंगळवार रोजी सकाळी १२ वाजता आत्मदान करणार.
मे. लॉयटस् मेटल्स अॅन्ड ऐलर्जी लिमिटेड लोहखनिज प्रकल्पामध्ये आमचे मुल नोकरी करित आहे. त्यांना काडून टाकत आहे. व काहि मुलांना काडण्याची धमकी देत आहे. अशा कारखान्याचा व्यवस्थापक मनमानी कारभारावरती प्रतिबंध उपाय योजना करण्यात यावी. अन्यता आम्ही सगळे शेतकरी सहपरिवारा सह आत्मदान करणार असल्याचा इशारा आज पत्रकार परिषदेतून देण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले,
गावातील अन्यायग्रस्त शेतकरी मोहनदास धोंडूजी राजूरकर, वामन बाबूजी राजूरकर, बंडू धोंडूजी राजूरकर, रामरतन बाबूजी राजूरकर, सुधाकर मल्हारी ठाकरे, नितेश पांडूरंग ठाउरी, कवडू गनपत अडबायले यांची उपस्थिती होती.
