उद्याला चंद्रपूर शहर व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन जिल्ह्यातील 7092 खटले प्रलंबित, नागरिकांनी आपसी समझोताने निपटारा करावे.. !



उद्याला चंद्रपूर शहर व तालुका न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

जिल्ह्यातील 7092 खटले प्रलंबित, नागरिकांनी आपसी समझोताने निपटारा करावे.. !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये न्यायालयात प्रलंबित प्रकरणांबाबत तसेच न्यायालयात दाखल होण्यापुर्वीच्या (प्रिलिटीगेशन) प्रकरणांबाबत दिनांक १२/०९/२०२६ रोजी चंद्रपूर शहर व तालुका न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने मा. श्री. अभय क. लाहोटी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक १२/०९/२०२६ रोजी होणा-या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ठेवण्यात येणा-या न्यायालयीन प्रलंबीत प्रकरणांबाबत शुकवार दिनांक ११/०९/२०२६ रोजी दुपारी ०१.०० वाजता, मिटींग हॉल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर 7 येथे पत्रकार परिषदेतून माहिती देण्यात आली.
जिल्ह्यात 7092 खटले प्रलंबित असून यात सर्वात जास्त खटले आर्थिक व्यवहारा संदर्भातील असून  समोरचाराने,  आपसी समझोत्याने निकाली काढावे. जेणेकरून कुणावरही आर्थिक भुदंड  बसू नये, असे यावेळी माहिती देण्यात आली असून, या मागचा उद्देशच असा आहे की, प्रकरणाचा निवाडा  जलद गतीने व्हावा ! म्हणून राष्ट्रीय लोक अदालितेचे आयोजन करण्यात आले आहे. याचा फायदा जिल्ह्यातील, तालुक्यातील  नागरिकांनी घ्यावा असे आव्हान करण्यात आले.
 सदरील पत्रकार परिषदेत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मा. सुधीर एस. इंगळे साहेब, मुख्य न्यायदडाधिकारी वाय. एल. मेश्राम साहेब यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विविध योजणांची व राष्ट्रीय लोक अदालत बाबतची विस्त्रुत माहिती पत्रकारांना दिली.
सदरील पत्रकार परिषदेचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन अॅड. महेंद्र वि. असरेट यांनी केले.