डीजेचा वाढता दणदणाट पर्यावरणासाठी घातक; ध्वनी प्रदूषणात डीजेवर बंदी काळाची गरज ! डीजेच्या आवाजाची मर्यादा किती?



डीजेचा वाढता दणदणाट पर्यावरणासाठी घातक; ध्वनी प्रदूषणात डीजेवर बंदी काळाची गरज !

डीजेच्या आवाजाची मर्यादा किती?

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : सण, उत्सव, मिरवणुका आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डीजेचा वाढता वापर नागरिकांसह पर्यावरणासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मोठ्या आवाजात वाजणाऱ्या डीजेमुळे ध्वनी प्रदूषण वाढत असून, त्याचा परिणाम मानवी आरोग्याबरोबरच पशू-पक्षी आणि परिसरातील पर्यावरणावरही होतो.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात डीजे वाजविण्यावर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने 450 डीजे व्यवसायकांना शपथ पत्र 'डेमो' मगच परवानगी अशी अट घातली आहे. तरीही डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे श्रवणशक्तीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, डोकेदुखी, झोपेचा त्रास, तणाव आणि चिडचिड यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती, आजारी नागरिक तसेच रुग्णालय परिसरातील नागरिकांना मोठ्या आवाजाचा अधिक त्रास होऊ शकतो. पशू-पक्ष्यांनाही तीव्र आवाजामुळे अस्वस्थता निर्माण होऊन त्यांच्या नैसर्गिक वर्तनावर परिणाम होऊ शकतो.
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जसे पुण्यात डीजे वाजवण्याविरोधात मोर्चा काढण्यात आला.
नागपुरात 1 नोव्हेंबरपर्यंत DJ बंदी; पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांनी मोठा निर्णय घेतला. न्यायालयानेही डीजेवर बंदी घातली आहे. मानवी आरोग्यास होत असलेले दुष्परिणाम पाहून चंद्रपुरात काही डीजे वाजवण्यावर बंदी घालावी अशी नागरिकांची मागणी आहे.
परंतु राजकीय,तसेच मिरवणुकीच्या तंत्रज्ञानामुळे हजारो तरुणांना रोजगारही मिळतो, असा युक्तिवाद 'डीजे 'समर्थक करत आहेत. तसे तरुणाईला पर्यावरणाची आणि ध्वनिप्रदूषणाची काहीही पर्वा नाही असे महाभाग, लेझर किरणांची आतिशबाजी, 'डीजे'च्या अजस्त्र ध्वनिक्षेपकांच्या व्यापासह मिरवणूक काढणे हे बहारदार दिसते. या निमित्ताने भारत तंत्रज्ञानात किती पुढारला आहे, याची चुणूक साऱ्या जगाला दिसते. अशा नवतंत्रज्ञानाने सजलेल्या मिरवणुका वारंवार काढाव्यात असा काही आक्रस्ताळी लोकांचा आग्रहो आहे.
दही हंडी नावाचा उत्सव उंबरठ्यावर आला असून पाठोपाठ गणेशोत्सवही येईलच. दही हंडी हा उत्सव मुंबईत उत्साहाने साजरा होतो, किती डीजे नाहीच्याबरोबर वाचतात. मग प्रत्येक शहरात डीजे न वाजवता उत्सव साजरे होत नाहीत का? पारंपारिक वाद्याचा उत्सवासाठी जसे की ढोल -ताशे टाळ -मृदुंग अशा वाद्यांचा वापर करणे गैर काय आहे?

डीजेच्या आवाजाची मर्यादा किती?
भारतामध्ये Noise Pollution (Regulation and Control) Rules, 2000 अंतर्गत ध्वनीची मर्यादा क्षेत्रानुसार निश्चित करण्यात आली आहे. साधारणपणे औद्योगिक क्षेत्रासाठी दिवसा 75 डेसिबल व रात्री 70 डेसिबल, व्यावसायिक क्षेत्रासाठी 65 व 55 डेसिबल, निवासी क्षेत्रासाठी 55 व 45 डेसिबल, तर शांतता क्षेत्रासाठी 50 व 40 डेसिबल अशी मर्यादा आहे. येथे दिवसाची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 आणि रात्रीची वेळ रात्री 10 ते सकाळी 6 अशी आहे.
मात्र, डीजे किती मोठ्या आवाजात वाजवता येईल याचा स्वतंत्र ‘डीजे डेसिबल’ नियम नसून, कार्यक्रमाच्या ठिकाणी लागू असलेल्या ध्वनी मर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच लाऊडस्पीकर/साउंड अॅम्प्लिफायरच्या वापराबाबत संबंधित प्राधिकरणाची परवानगी व स्थानिक नियम लागू होतात. डीजे डेसिबल साधारणपणे 70 डेसिबल च्या वर्तच वाचतात. मग 450 डीजे व्यवसायिकाची शपथपत्र घेतले त्यांना डेमो घेऊनच परवानगी देणार असे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले असले तरी, या नियमांचे पालन करण्याची गरज
उत्सवाचा आनंद घेताना इतर नागरिकांच्या आरोग्यावर आणि पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने डीजे व ध्वनिवर्धकांच्या आवाजाची तपासणी करून निर्धारित डेसिबल मर्यादा आणि वेळेचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत असून ‘उत्सवाचा आनंद घ्या; मात्र ध्वनी प्रदूषण वाढवून इतरांचा त्रास वाढवू नका,’ असा संदेश देत डीजेच्या वापरावर संयम आणि नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज व्यक्त होत आहे. आता या 'डेमो' च्या मर्यादीकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहेत.