रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये इंडियन मेडिकोज एजन्सीला भीषण आग, करोडोचे नुकसान !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये इंडियन मेडिकोज एजन्सीला पहाटे तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागली.
आगीचे भीषण रूप पाहता अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी तब्बल 30 ते 35 अग्निशामक दलाच्या वाहनांचा उपयोग करावा लागला तरी सायंकाळी सहा वाजता पर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.
शहरातील नामवंत असलेल्या इंडियन मेडिकोच एजन्सी चे मालक आकाश पाजनकर आणि कमलेश पाजनकर असल्याचे माहिती समोर आली असून त्यांचे या कॉम्प्लेक्स मध्ये तीन स्टोरेज रूम मध्ये मेडिकोज साहित्य करोडो रुपयाचे आगीत जळून खाक झाले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात आहे.
अग्निशामक दलाला आग विझवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. या कॉम्प्लेक्स च्या तिन्ही बाजूला अग्निशामक दल जाण्यासाठी कुठलीही जागा उपलब्ध नाही. एका छोट्याशा गल्लीतून अग्निशामक दलाने पाईपच्या सहाय्याने आग विजवण्याचे प्रयत्न केले.
याच कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल शॉप ,कपड्याची दुकाने आणि त्यांच्याच बाजूला वरती रेसिडेंट असून त्यांनाही या आगीचा मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी एजन्सीच्या मालकाचे करोडो रुपयाचे नुकसान झाले असून त्यांच्या काउंटर मध्ये ठेवलेल्या सहा लाख रुपये जळून खाक झाल्याची माहिती समोर येत आहे.
रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये इंडियन मेडिकोज एजन्सीला भीषण आग, करोडोचे नुकसान !
या कॉम्प्लेक्स मध्ये अनेक व्यवसायिकांचे प्रतिष्ठान असून
अपरिहार्य घटना घडल्यास इथे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, कॉम्प्लेक्स निर्माण करताना आजूबाजूला तसेच वरती बांधकाम केलेल्या बांधकामावर प्रश्न निर्माण झाले असून आत मधल्या पार्किंग वरही प्रश्नचिन्ह उद्भवत आहेत. या कॉम्प्लेक्सचे बांधकाम सुरू असताना पासून तर आतापर्यंत या कॉम्प्लेक्स वर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. पार्किंगच्या बेसमेंट मध्ये पाणी भरले जात असून या पार्किंग मध्येच व्यापारी संकुल आहे. परंतु कुठेही प्रशासनाने लक्ष दिले नाहीत. त्यातच ही मोठी घटना समोर आली आहे.
