सलूनच्या नावाला कलंक लावणाऱ्या 'स्पा' सेंटरवर कारवाई कधी ... ?
चंद्रपुरात नागपूर रोडवर 'स्पा' सेंटरचे अवैध्य कारनामे... !
सोशल मीडियावर चाललेल्या त्या बातमीचा इम्पॅक्ट काय?
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरात काही वर्षांपूर्वीपासून 'स्पा' नावाच्या सेंटरने धुमाकूळ घातलेला आहे. ग्राहकांना प्रलोभन देऊन मसाज सेंटरच्या नावा आड 'एक वेळा करून पहा मजा येईल!! असे प्रलोभन देऊन ग्राहकाची दिशाभूल करून सर्रास स्पा नावाच्या सेंटरमध्ये अवैद्य धंदे सुरू असल्याचा पडदा फास एका सोशल मीडियाच्या माध्यमातून उघडकीस आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.?
चंद्रपुरात शहरात नागपूर रोडवर स्पा सेंटरचे अवैध्य धंद्याचे कारनामे... ! सुरू असल्याचा प्रसार माध्यमावर
बातमी पसरतात त्या 'स्पा' सेंटरवर कारवाई काय झाली? सोशल माध्यमावर चाललेल्या त्या बातमीचा इम्पॅक्ट काय झाला ?
हे अनुत्तरीत असलं तरी, फॅशनेबल, आणि ग्राहकांना प्रलोभन देऊन सलून च्या नावाला बदनाम करण्याचे काम या स्पा सेंटरने केल्याचे म्हटले तर वांगी ठरणार नाही.
आजही अनेक सलून मध्ये महिला काम करतात. जातिवंत सलून चालकांकडून आतापर्यंत कुठल्याही अवैध्य धंद्याचे कारनामे समोर आले नाहीत. मात्र फॅशनेबल स्पाने सलून सारख्या व्यवसायाला बदनाम करण्याचे कारस्थान सुरू असल्याने सलून सारख्या पारंपारिक व्यवसायाला या अवैध्य व्यवसायामुळे झळ पोचली आहे.
सलून मध्ये दीडशे -दोनशे रुपयात कटिंग दाढी होणाऱ्या ग्राहकांना चांगली सेवा देण्याचे कामही सलून दाराकडून होत असते. मात्र मागील काही वर्षापासून या 'स्पा' नावाच्या सलून व्यवसायाने पिढी जात सलून व्यवसायाला बदनाम करण्याचे काम केले.
स्पा सलून व्यवसायात मसाज च्या नावावर सर्रास अवैद्य धंदे सुरू असल्याची बोंब नेहमीच होत असते. मात्र या अवैध्य व्यवसायाला धनधांडग्याचे पाठबळ असते?.कि जे सर्रास खुलेआम 'स्पा' नावाच्या काळाधंदा सलूनच्या धंद्या आड राजरोसपणे सुरू करतात. म्हणून चंद्रपूर शहरातील सुरू असलेल्या ' स्पा' सेंटरवर पोलीस प्रशासनाने चौकशी करून कळक करावी कारवाई करावी अशी मागणी आता चंद्रपुरातील सुज्ञ नागरिक करत आहेत.
