दल - बदल नीचपणा गाठणाऱ्या नगरसेवकांना जाब विचारा- डॉ. दिलीप कांबळे
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर येथील महानगरपालिकेत झालेल्या निवडणुकीदरम्यान ज्या नगरसेवकांना निवडून आणले, तेच नगरसेवक आज गद्दार झाले असा घनघती आरोप
डॉ दिलीप कांबळे, आज पत्रकार परिषदेतून केला.
मागच्या दहा वर्षापासून आधी नागपूरचे मान आमदार नितीन भाऊ राऊत यांचा कार्यकर्ता ते काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी म्हणुन व मागच्या चार वर्षापासून मा आ.विजुभाऊ वडेट्टीवार, मा .खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि पूर्व आमदार सुभाष धोटे यांचा नेतृत्वात चंद्रपूर येथे कायर्रत त्यांचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. तसेच मा विजूभाऊ यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चा प्रदेशसचिव तथा बहुजन समता पर्व या सामाजिक संघटनेचा मुख्य संयोजक म्हणूनही कार्यरत आहे..
फुले शाहू आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून विचारधारेवर निष्ठा आणि वैयक्तिक आयुष्यात प्रामाणिकता आणि चरित्र हे माझ्या जीवनाचे अविभाज्य अंग असून आजपर्यंत कोणाच्या चार आणा ला मी दागिलदार नाही.
बौद्ध समाजात वैचारिक तथा सांस्कृतिक चळवळ ठीक ठाक आहे. परंतु राजकीय समज, बेरजेचे राजकारण अतिशय कमजोर आहे. आणि त्यामुळे बौद्ध समाजात राजकीय नेतृत्व घडविणे , निवडणुकीत जिंकणारे राजकारणाचा आत्मविश्वास निर्माण करणे आणि माझ्या कांग्रेस पक्षाचा राजकीय स्कोअर वाढविणे या उद्देशाने मी माझ्या पक्षातली संपूर्ण पत /क्रेडिट वापरून , झगडे भांडण करून, काँग्रेस पार्टीत महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या निवड समितीत प्रतिष्ठा पणाला लावून 5 उमेदवारांना जसे विनोद लाभणे, महानंद वाळके ,आकाश मानकर , करिष्मा जंगम आणि हनुमान चौके या 5 उमेदवारांना उमेदवारी मिळवून देऊन ,निवडणुकीत मी स्वत खर्च करून 5 सीट्स निवडून आणले.त्यात एक आदिवासी आणि चार SC आहेत.. SC पैकी 3 SC बौद्ध आणि क्रिश्चन SC आहे. आदिवासी आणि क्रिश्चन SC घोडेबाजारीत तटस्थ भूमिका घेऊन बरोबर आहेत.
परंतु बौद्ध समाजाचे तिन्ही उमेदवार मिठाई घेऊन आज इकडे, दुसरी कडून मिठाई आली का उदया दुसरी कडे, पुन्हा पहिल्या कडून मिठाई आली परत पहिल्याकडे.. हे चालू आहे. परंतु बौद्ध समाजाचे तिन्ही उमेदवार मिठाई घेऊन आज इकडे, दुसरी कडून मिठाई आली का उदया दुसरी कडे, पुन्हा पहिल्या कडून मिठाई आली परत पहिल्याकडे.. हे चालू आहे. आणि हा नीचपणा फक्त बौद्ध उमेदवारच करत आहेत बाकी सर्व आपापली भूमिका घेऊन तटस्थ आहे.आणि त्यामुळे संपूर्ण बौद्ध समाजच असा आहे का ? अशा प्रकारच प्रश्न पडणे स्वाभाविक आहे ? आणि मीच या लोकांना तिकिट दिले, पैसे लावले, प्रचार केला, समाजाला वोट मागितले, विनंती केली, त्यामुळे ह्या नीचपणा मध्ये मी पण तर सामील नाही असा ही प्रश्न किंवा माझ्याच नेतृत्वात हे होत तर नाही अशा प्रकारचा प्रश्न उद्भभवने स्वाभाविक आहे.ज्या माणसाने आपल्याला निवडून आणले , सीट दिली , पैसे लावले त्यांचे करियर झाले ते त्यांचेच नाही झाले तर सामान्य जनतेचे कसे काय होतील, हा विचार जनतेने करावा आणि ह्याचा ह्यांना जाब विचारावा अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून डॉक्टर दिलीप कांबळी यांनी दिली.
