भिशी- शंकरपूर- येथे वाघाने घेतला ईश्वरचा बळी परिसरातील तिसरा बळी! chimur forest




भिशी- शंकरपूर- येथे वाघाने घेतला ईश्वरचा बळी
परिसरातील तिसरा बळी!
दिनचर्या न्युज
चिमूर :-
काल सायंकाळी भिशी -शंकरपूर येथील वन विभाग परिक्षेत्रात असलेल्या आंबोली -आसोला गावालगत असलेल्या वन परिक्षेत्रातील शंकरपूर येथील ईश्वर भरडे या युवकावर वाघाने हल्ला करून ठार केले. कार्यतत्पर व संवेदनशील असलेले ईश्वर भरडे त्यांच्यावर झालेल्या घटनेमुळे परिसरातील नागरिक चांगलेच वन विभागावर भडकले. काही वेळासाठी तणावही निर्माण झाला होता.
काही दिवसापूर्वीच शेतात कामावर असलेल्या एका महिलेवर वाघाने हल्ला केला.परंतु तिने आरडाओरडा केली असता तिच्या जवळ असलेल्या तिच्या डेराने तत्परता दाखवत वाघाला हाकलले या घटनेपासून त्या महिलेला वाचवले. ही घटना ताजी असतानाच काल पुन्हा वाघाने एकाचा बळी घेतला.
समस्त घटनेची माहिती गावकऱ्यांना होतास परिसरातील  नागरिकांचा जमाव एकत्र येऊन  वन विभागावर चांगलाच रोष व्यक्त केला  .  चिमून  परिक्षेत्रातील  हा तिसरा वाघाचा बळी असून  काही दिवसापूर्वीस लावारी येथील एका  महिलेचा  वाघाने बळी घेतला होता. त्यानंतर शिवरा येथील माजी सरपंच असलेल्या  व्यक्तीवर वाघाने हमला करून ठार केले. या परिसरात सध्या वाघाची चांगली दहशत निर्माण झाली असून परिसरातील नागरिक दहशतीत वावरत आहेत. वन विभागाकडून तात्पुरती कारवाई केली जाते. परंतु  वाघांचा बंदोबस्तासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने  नागरिकात  खंत व्यक्ती केली जात आहे.