मोक्का गुन्हयातील फरार आरोपी आकाश बहुरियाला अटक



मोक्का गुन्हयातील फरार आरोपी आकाश बहुरियाला अटक

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथील महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MCOCA) गुन्हयातील फरार आरोपी अटक करण्यात आली
पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अप. क. ७५८/२०२५ कलम ३१० (४) भारतीय न्याय संहिता, सहकलम ३, ४/२५ भारतीय हत्यार कायदा आणि सहकलम ३ (१) (ii), ३(२), ३(४) महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा, १९९९ (MCOCA) या गुन्ह्यातील घटनास्थळावरून फरार झालेला आरोपी नामे आकाश उर्फ मोनू बिरजू बहुरिया, वय 34 वर्ष, रा. सातनल चौक, आंबेडकर वार्ड बल्लारपूर यास उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर यांच्या विशेष तपास पथकाने सावंगी, वर्धा येथून अटक केली आहे.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रपूर श्री प्रमोद चौगुले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री दत्तात्रय कोलाटे, पोअं रुपेश पराते, शेखर माथनकर, सुरज शेडमाके, योगेश पिदूरकर , रामकांत गाव्हणे मोक्का पथकाने केलेली आहे.