चंद्रपूर महानगरपालिकेचे सार्वत्रिक निवडणूक वेळापत्रक जाहीर
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने दिनांक 15 डिसेंबर 2025 रोजी जाहीर केलेल्या मनपा सार्वत्रिक निवडणूक वेळापत्रकानुसार चंद्रपूर महानगरपालिका मतदार संघाकरिता मनपा आयुक्त यांनी पत्रकार परिषद घेऊन दिनांक 15 जानेवारी 2026 रोज गुरुवार या दिवशी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे.
दिनांक 23 डिसेंबर 2025 मंगळवार ते 30 डिसेंबर 2025 मंगळवार सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देश पत्र देण्यात कालावधी असून गुरुवार 25 डिसेंबर व रविवार 28 डिसेंबर या दिवशी नामनिर्देश पत्र देण्यात येणार नाहीत. 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर मंगळवार सकाळी 11 ते तीन पर्यंत नामनिर्देश पत्र स्वीकारण्याचा कालावधी असून दिनांक 25 डिसेंबर रविवारी 28 डिसेंबर रोजी नामनिर्देश पत्र स्वीकारण्यात येणार नाहीत. 31 डिसेंबर रोजी सकाळी 11:00 पासून नामनिर्देश पत्राची छाननी होणार आहे. छानणी पूर्ण झाल्यानंतर लगेच वैद्यरित्या नामनिर्देश झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. 2जानेवारी 2026 ला सकाळी 11 ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. 3 जानेवारी 2026 शनिवारला 11 वाजल्यापासून
निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. 3 जानेवारीला उमेदवाराची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून 15 जानेवारीला साडेसात वाजता ते सायंकाळी 5:30 पर्यंत
मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. 16 जानेवारीला सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार असून दिनांक 19 जानेवारीला शासन राजपत्रात निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेसाठी महानगरपालिका चंद्रपूर त्यांनी मतदार क्षेत्रातील निवडणुका यशस्वी पार पाडण्यासाठी प्रशासन कामाला लागले आहे. चंद्रपूर महानगरपालिकेत एकूण 17 प्रभाग असून या प्रभागातून 66 उमेदवार निवडले जातील. शहरातील एकूण मतदार केंद्राची संख्या 355 असून, एकूण मतदार संख्या दोन लाख 99 हजार 94 एवढी असून, यात पुरुष मतदार संख्या एक लाख 49 हजार 609 तर महिला मतदार संख्या एक लक्ष 50 हजार 354 असून इतर मतदार संख्या 31 आहे. तर दिव्यांग मतदार पुरुषांच्या 532 असून मतदार महिला संख्या 275 असून एकूण दिव्यांग मतदार संख्या 807 आहेत. या दिव्यांगणासाठी व्हील चेअर ची व्यवस्था असून प्रत्येक त्यावर मतदाराच्या मदतीकरिता 18 वर्षाखालील एक मदतनीस स्वयंसेवक नियुक्ती करण्यात आले आहेत. निवडणूक पण केंद्राच्या ठिकाणी मूलभूत सुविधाही देण्यात आले आहेत. मतदान प्रक्रियेवर देखरेख व नियंत्रण ठेवण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेत विविध यंत्रणा कक्ष स्थापन करण्यात आले असून पण प्रक्रिया पार पाडण्यात प्रशासन सज्ज झाले आहेत.अशी माहिती आज पत्रकार परिषदेतून आयुक्त अकनुरी नरेश यांनी दिली. 15 जानेवारीला होत असलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्व नागरिकांनी मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजवावा व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी सहभाग नोंदवावा असे आव्हाने त्यांनी केले
