गंजवार्डात मोकाट जनावरामुळे व्यापारी व नागरिकांना त्रास ! मनपाने बंदोबस्त करावा ! मनपाच्या अतिक्रमण दलाने रस्त्यावरील साहित्य केले जप्त




गंजवार्डात मोकाट जनावरामुळे व्यापारी व नागरिकांना त्रास ! मनपाने बंदोबस्त करावा

मनपाच्या अतिक्रमण दलाने रस्त्यावरील साहित्य केले जप्त

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
चंद्रपूर शहरातील प्रसिद्ध असलेले भाजी मार्केट गंजवार्ड येथे भाजीपाला घेण्यासाठी संपूर्ण शहरातून नागरिकाची वर्दळ असते. ठोक भावाने ग्राहकांना भाजीपाला मिळत असल्याने शहरातील नागरिकांचा इकडे ओग असतो. परंतु कायलांतराने या भाजी मार्केटमधील काही भाजीपाला विकणाऱ्या व्यापारांच्या तराजूच्या तपावतामुळे ग्राहकांचा ओढ कमी झाला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, या मार्केटमध्ये भाजीपाला विकणारे ग्राहकांना एक किलोच्या ऐवजी पाऊण किलो वस्तू मिळत असल्याने या मार्केटकडे ग्राहकांची विश्वहर्ता कमी झाली आहे.
काही महिन्यापासून या भाजी मार्केटमध्ये म्हशी,गाई या मोकाट जनावराचा वावर जास्त वाढला आहे. त्यामुळे येथील व्यापाऱ्यांना व ग्राहकांना त्यांचा चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना या म्हशी आपल्या शिंगानी खेटाळत जात असतात. त्यामुळे मार्केटमध्ये पळापळी होत असते. भविष्यात यामुळे मोठी दुर्घटना होऊ नये याकडे मनपा प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या ठिकाणी येत असलेल्या म्हशीचा, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी येथील भाजी विक्रेत्यांची केली आहे.
गंजवार्डात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या हातठेले व व्यापारांचे वजन काटे व साहित्य आज महानगरपालिकेच्या अतिक्रमण दलाने जप्त केले. गंजवार्ड येथील मुख्य रस्त्यावर हातठेलेवाले नाहक अतिक्रमण करून रस्त्यावर वाहतुकीला अडचण निर्माण करीत असतात. वारंवार सांगून सुद्धा ऐकत नसल्याने आज मनपा प्रशासनाने त्यांचे वजन काटे व साहित्य जप्त केले असल्याचे सांगितले जाते.