प्राध्यापक माधव गुरूनुले यांच्या सेवानिवृत्ती सोहळा निमित्य सत्यशोधक प्रबोधन मेळावा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :- chandrapur
सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूर द्वारा दिनांक ७ डिसेंबर 2025 ला सत्यशोधक प्रबोधन मेळावा व सत्यशोधक प्राध्यापक माधव गुरुनुले यांचा सेवानिवृत्ती सन्मान सोहळा सत्यशोधक समाजाचे जिल्हाध्यक्ष माननीय एडवोकेट हिराचंद बोरकुटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला त्यावेळेस विचार मंचावर सत्काराचे मानकरी प्राध्यापक माधव गुरमुले सह पत्नी सविता गुरनुले प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अशोक चोपडे वर्धा प्रमुख अतिथी प्राध्यापक नामदेवराव जेंगठे माननीय बळीराज धोटे, डॉ अभिलाषा गावतुरे, प्रा सुरेश लोनबले, किशोर पोतनवार उपस्थित होतेप्रमुख मार्गदर्शक डॉक्टर अशोक चोपडे यांनी बदलत्या परिस्थितीत सत्यशोधकाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना म्हटले की सत्यशोधक समाजाला महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्री आई फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेला आहे सध्या देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बेरोजगारी, शेतकरीआत्महत्या, व्यक्ती स्वातंत्र्यावर अनेक बंधने, धार्मिक कर्मकांड, मानवी अधिकाराची उल्लंघन, अशी स्थिती निर्माण झाली असून सत्ताधारी वर्गाची दडपशाही अशी अनेक आव्हाने आहेत यातून बाहेर पडायचे असल्यास तर सत्यशोधकांनी ज्योतिराव फुले राजश्री शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार गावागावात पोहोचविला पाहिजे सत्यशोधकाचा इतिहास समाजाला सांगायला पाहिजे स्वातंत्र्य समता बंधुता व न्याय या भारताच्या संविधानातील मूल्य रुजविण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले पाहिजे आणि ही जबाबदारी सत्यशोधक पार पाडतील अशी मला खात्री आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष एडवोकेट हिराचंद बोरकुटे यांनी सुद्धा देशातील परिस्थिती बघता सत्यशोधक व महिलांनी स्वतःमध्ये मोठे परिवर्तन करून जबाबदारी पार पाडावे लागेल असे आव्हान केले.
या विशेष प्रसंगी सत्यशोधक प्राध्यापक माधव गुरूनुले यांचा सहपत्नीक शाल सन्मानचिन्ह मानपत्र साडी चोळी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना प्राध्यापक माधव गुरूनुले म्हणाले की मी 33 वर्षाची डॉक्टर खत्री महाविद्यालय तुकूम चंद्रपूर येथे सेवा करून सेवानिवृत्त झालो महाविद्यालयाने मला मोठे केले आम्ही सुद्धा महाविद्यालयासाठी संघर्ष केला परिश्रम केले यासोबत मी सामाजिक राजकीय पर्यावरण अंधश्रद्धा निर्मूलन ओबीसी चळवळ सत्यशोधक समाज इत्यादी चळवळीशी प्रामाणिक राहून विशाल मोर्चे धरणे कार्यक्रम प्रबोधन रॅली विविध व्याख्याने महापुरुषांची जयंती व स्मृतिदिन निमित्याने गावागावात जाऊन ग्रामीण भागातील जनतेला मार्गदर्शन केले भारतीय संविधान समजावून सांगण्याचा प्रयत्न केला देशातील चांगले नागरिक घडवण्यासाठी जेवढे प्रयत्न करता येईल व तेवढे प्रयत्न केले आपण माझा सत्कार केला त्यामुळे पुन्हा आमची समाजाप्रती जबाबदारी वाढली आहे मी पूर्ण ताकदीनिशी माझी जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विविध संघटना प्रतिनिधी व मान्यवर नागरिकांनी सत्कारमूर्तीचा यथोचित सत्कार केला
कार्यक्रमाचे संचालन एडवोकेट प्रशांत सोनुले प्रास्ताविक अरुण धानोरकर प्रदर्शन पांडुरंग गावतुरे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अविनाश आंबेकर रजनी कार्लेकर येशूताई पोतनवार सुयोग ठाकरे एच बी पटले व सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
