तलाठ्याच्या चुकीमुळे रेल्वेलाईन मध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्यास शेतकऱ्याचा आत्मदहनाचा इशारा!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील मौजा घोडपेठ येथील शेतकरी शामराव काशिनाथ घोटकर वय 67 वर्षे
यांची शेतजमीन वर्धा-सेवाग्राम तिर-या लाईमध्ये तलाठी घोडपेठ यांच्या चुकीमुळे बिना मोबदला न मिळाता माझी जमीन 0.10हे.आर. रेल्वेवाल्याने जबरीने ताब्यात घेतली असून मी वारंवार या संदर्भात महसूल विभाग व रेल्वे विभाग यांना मोबदला मागित असताना सुद्धा मला मागील तीन वर्षापासून कार्यालयाच्या हेलपाटा माराव्या लागत आहेत.
माझे मालकीची व विकत घेतलेली मौजा घोडपेठ तह. भद्रावती जि चंद्रपुर येथील सर्वे 24/1 एकुण आराजी 0.62 हे.आर. धाणारी शेतजमीन मी आराजी 0.20हे. आर. विकत घेतलेली आहे. यामध्ये तलाठी घोडपेठ यांना फेरफार करण्याकरीता दिले असता त्यांनी माझी आराजी 0.20हे.आर. माझे नावाने करून दिली. व सात-बारा वेगळा झाला असुन त्यामध्ये 24 क असा उल्लेख करण्यात आला मी अशिक्षित असल्यामुळे मला याबाबत काहीही माहीती नाही. जेव्हा माझी जमीन वर्धा-सेवाग्राामच्या तिस-या लाईन मध्ये आराजी 0.10 हे.आर. गेली तेव्हा माझे नाव मोबदल्यामध्ये उल्लेख झालेला नाही, माझे पुतणे नामे शंकर घोंडु घोटकर व इतर यांना मोबदला देण्यात आला. परंतु मी उपविभागीय अधिकारी वरोरा तसेच रेल्वे अधिकारी यांना तोंडी व अर्जाद्वारे लेख दिले परंतु माझे गरीब मानसाची कोणीही तकार न घेता साधी चौकशी सुध्दा केलेली नाही. रेल्व अधिकारी यांनी जबरदस्तीने माझे धान गाट्यामध्ये माती टाकली असुन त्यामध्ये त्याला कोणतेही पिक घेता आले नाही. अनेकदा अधिका-यांना भेटले असता माझी तकार कुणीही एकुण घेतली नाही.तरी माझी विनंती आहे कि, मला माझी जमीन किंवा जमीनीचा मोबदला देण्याकरीता आपण सर्व मंत्रीगण तथा महसूल अधिकारी यांना पत्र दिले आहे. मला न्याय दयावा अन्यथा एक महिण्यात जर याची शाहानिशा करून न्याय न मिळाल्यास तहसिल कार्यालय भद्रावती येथे विष प्राशन करून मी माझे जिवन संपविणार असल्याचा इशारा शामराव घोटकर यांनी पत्रकार परिषदेतून दिला. यावेळी त्यांच्यासोबत प्रदीप देवगडे उपसरपंच घोरपेट, राजू बोडे यांची उपस्थिती होती.
