नवनिर्वाचित नगराध्यक्षाअँड. प्रियदर्शीनी अशोक उईके यांचा आदिवासी महिलांकडुन भव्य सत्कार chandrapur



नवनिर्वाचित नगराध्यक्षाअँड. प्रियदर्शीनी अशोक उईके यांचा आदिवासी महिलांकडुन भव्य सत्कार

दिनचर्या न्युज :- 
चंद्रपूर :
दि. १९ जानेवारी २०२६ रोज सोमवारला सकाळी ११.०० वाजता जननायक बिरसा मुंडा चौक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, चंद्रपूर येथे आदिवासी महिलांचे भव्य स्नेह संमेलन व हळदीकुंकवाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याच मेळाव्यात यवतमाळ नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सन्मा. अँड. प्रियदर्शीनी अशोक उईके यांचा हृद्य सामाजिक सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन चंद्रपूरातील प्रसिध्द समाजसेविका मान. डॉ. अभिलाषा गावतूरे, प्रसिध्द रेडीऑलॉजिस्ट मान. डॉ. शारदा येरमे, मान. डॉ. ममता आदेवार, मेडीकल ऑफीसर हे उपस्थित राहुन मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन आदिजन चेतनेचा जागर महिला मंडळ व जनसेवक पालकमंत्री नाम. डॉ. अशोक उईके फॅन्स क्लबतर्फे करण्यात येत आहे. याप्रसंगी आदिवासी नृत्य सादर करण्यात येऊन उपस्थित महिलांना हळदीकुंकू व स्नेहभेट देण्यात येणार आहे. स्नेहभोजनाने या कार्यक्रमाची सांगता होईल.
पत्रपरीषदेस अॅड. अशोक तुमराम, वारलु मेश्राम, पुरुषोत्तम सोयाम, अशोक उईके, वामन गणवीर, गोकुल मेश्राम, पौर्णिमा तोडकर, वैशाली मेश्राम, अश्विनी मेश्राम विना कोटनाके,आदी उपस्थित होते. या कार्यक्रमास सर्व समाजबांधवांनी उपस्थित राहुन कार्यक्रम यशस्वी करण्याचे आवाहन आयोजकांकडुन यावेळी करण्यात आले.