चंद्रपुरात अवघ्या एका महिन्यातच दुसरा जागतिक शांतीसाठी विश्वविक्रम होणार !chandrapur




चंद्रपुरात अवघ्या एका महिन्यातच दुसरा जागतिक शांतीसाठी विश्वविक्रम होणार !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपुरात याच महिन्यात एक मार्च 2026 रोजी सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन या संस्थेने 27 से महिला व विद्यार्थिनीच्या सहभागातून अवघ्या सात मिनिटात 20 लावण्यांचे सादरीकरण करून जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता. आता अवघ्या एक महिन्या दुसरा जागतिक विक्रम करण्याच्या उंबरठ्यावर ही संस्था उभी आहे. चंद्रपूर शहरासाठी ती अत्यंत अभिमानाची बाब मानली जात आहे. चंद्रपूर शहराचे जागतिक शांतीसाठी विश्‍वक्र विक्रम होऊन पुन्हा एकदा नाव जागतिक स्तरावर कोरल्या जाईल. असे सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन संस्थेचे चेअरमन पी. एस. आंबटकर यांनी आज पत्रकारांसमोर सांगितले.
जगभरात वाढत चाललेले युद्धजन्य वातावरण, महागाई आणि अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर "युद्ध नव्हे, तर शांती हवी" हा प्रभावी संदेश देण्यासाठी चंद्रपूर येथील सोमय्या ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स पुढे सरसावला आहे. शनिवार, २८ मार्च २०२६ रोजी वडगाव येथील सोमय्या कॅम्पसमध्ये हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सहभागातून मानवी साखळी बनवून जगातील सर्वात मोठे " जागतिक शांतता चिन्ह" (International peace Symbol" साकारण्यात येणार आहे. या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असून हा कार्यक्रम जगातील सुमारे १८० देशांमध्ये प्रसारित होणार असल्यामुळे त्याचे महत्त्व अधिक वाढले आहे.
जागतिक स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढता तणाव आणि तृतीय महायुद्धाच्या शक्यतेमुळे लाखो निरपराध लोकांचे जीव व संपत्ती धोक्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमधील विद्यार्थी शांततेचा अनोखा आणि प्रभावी संदेश देण्यासाठी सज्ज झाले आहेत. हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकार होणारे हे शांततेचे चिन्ह केवळ एक आकृती नसून मानवतेची एकता, सहअस्तित्व आणि जागतिक शांततेची हाक यांचे प्रतीक ठरणार आहे.
या उपक्रमामागे संस्थेचे अध्यक्ष श्री. पी. एस. आंबटकर  यांची दूरदृष्टी आणि सामाजिक बांधिलकी स्पष्टपणे दिसून येते. आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेल्या आणि यापूर्वीही गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड घडविणाऱ्या सोमय्या ग्रुपने पुन्हा एकदा जगाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे.
सोमय्या कॅम्पसमध्ये साकारला जाणारा हा ऐतिहासिक क्षण केवळ विक्रमापुरता मर्यादित नसून जगभरातील मानवतेला शांततेचा आणि एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. जगातील सुमारे १८० देशांनी स्वीकारलेल्या " जागतिक शांतता चिन्ह" " (International peace Symbol "'च्या माध्यमातून चंद्रपूरमधून शांततेचा सकारात्मक संदेश संपूर्ण जगात पोहोचणार असून, या उपक्रमामुळे चंद्रपूरचे नाव जागतिक पटलावर ठळकपणे झळकणार आहे.