मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावरील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी वनगुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरु




मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावरील व्हायरल व्हिडिओ प्रकरणी वनगुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरु

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
दिनांक 15/03/2026 रोजी मोहर्ली-पद्मापूर रस्त्यावर लोक वाहने थांबवून व्हिडीओ काढत असतांना आणि रस्त्याच्या खाली उतरून वाघाचा रस्ता अडवून, वाघाचा पाटलाग करून व्हिडीओ काढत असतांनाचा व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल झाला. या गंभीर प्रकरणावर वनविभागाने चौकशी सुरु केली आहे. वाघाच्या भ्रमणमार्गावर वाहने थांबविणाऱ्या वाहने जप्ती कार्यवाही करण्यात येणार असून रस्त्याच्या खाली उतरलेल्या आरोपीवर वनगुन्हा क्रमांक-09654/211333, दिनांक 15/03/2026 भारतीय वन अधिनियम 1972 अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची ओळख पटवून न्यायालयीन कार्यवाही करण्यात येणार आहे.

वनगुन्ह्याची चौकशी वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली श्री. संतोष थिपे करीत आहे. व्हिडीओ मध्ये असलेल्या आरोपींची ओळख पटल्यास 9834689541 या क्रमांकावर माहिती द्यावी. असे आव्हान करण्यात आले आहे. अश्या प्रकारच्या घटना टाळण्याचे व वन्यजीवांचे भ्रमणमार्गात अडथळे न आणण्याचे आव्हान वनविभागा मार्फत करण्यात आले आहे.