व्याघ्रदिन, पिंजऱ्यात जेरबंद असलेल्या नरभक्षक वाघांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ... !




व्याघ्रदिन, पिंजऱ्यात जेरबंद असलेल्या नरभक्षक वाघांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा ... !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्याने वाघ वाचवण्यासाठी वनजीव रक्षक, आणि संस्था यावर काय उपाययोजना करतात! त्यांचे कार्य काय महत्वाचे आहे. वन संवर्धनाची
जबाबदारी, पर्यटकाची वाढती गर्दी, जंगल परिसरात निर्माण झालेले रिसोड, जंगल परिसरात वाढणारी गर्दी यावर नियंत्रण करणे तितकेच गरजेचे आहे.
मनुष्य बळी घेतलेल्या वाघांना जेरबंद केल्या जाते, तेच वाघ आहेत की, नाही याची शहानिशाही होत नाही, परंतु हमला करणारे वाघ तेच असल्याचा दावा करून पकडण्यात येतात, मात्र वर्षानुवर्ष त्या वाघांना बंदिस्त करून ठेवल्या जातात, पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात येत नाहीत. यामुळे पिंजऱ्यात बंद असलेल्या नरभक्षक वाघांच्या अधिवासाच्या व्यक्ति स्वातंत्र्यावर गदा येत नाही का? असाही प्रश्न उपस्थित होतो.
जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वाघाचे संगोपन करणे, वाघ वाचवणे गरजेचे असले तरी, मानव संरक्षण होणेही गरजेचे आहे. वाघाची वाढती संख्या पाहता, वन्यजीव आणि मानव संघर्ष खूप वाढलेला दिसत आहे. यावरही प्रतिबंध होणे गरजेचे आहे.

जिल्ह्यात मागील दोन वर्षात वाघांचे हल्ल्यात वाढ झाली आहे. मागील दोन वर्षात नागरिकांवर हल्ला करून मारणाऱ्या 28 नरभक्ष वाघांना वन विभागाने चंद्रपुरातील TTC सेंटर व इतर वन परीक्षेत्रात पिंजऱ्यात जेरबंद करून ठेवण्यात आले .TTC सेंटर ला ठेवलेल्या वाघांमध्ये 6 बछडे, 4 नर वाघ व 3 मादी वाघांचा समावेश आहे.जागेच्या अभावी इतर वाघांना दुसऱ्या जिल्ह्यातील TTC सेंटरला स्थानांतरित करण्यात आले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात TATR , ब्रम्हपुरी प्रादेशिक व FDCM जंगलाचा समावेश आहे.या जंगल क्षेत्रात शेकडो वाघांचा वावर आहे.मागील दोन वर्षात जिल्ह्यातील जंगल क्षेत्रात मानव वन्यजीव संघर्षात मोठी वाढ झाली आहे,परिणामी वाघांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे.वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार वाघाने नागरिकांवर केलेले 90% हल्ले घनदाट जंगलात झाले आहे.त्यात गुरे चारणाऱ्या गुराख्यावर ,मेंढपाळ, तेंदूपत्ता संकलन करणाऱ्या मजदूर,सरपण गोळा करणारे,राणभाजी तोडन्यासाठी गेलेल्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. इतर हल्ले जंगल परिसरातील शेत शिवारात झाले आहे. हल्लेखोर वाघ दोषी आहेत का?कि मानव असा प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
वाघाच्या हल्ल्यात एखाद्या नागरिकाचा मृत्यू झाल्यास PCCF ची परवानगी घेऊन नरभक्ष वाघाला जेरबंद केले जाते. 2022 च्या पहिले चार ते पाच लोकांना मारणाऱ्या वाघाला पकडण्याची परवानगी PCCF द्वारे दिली जात होती.परंतु सध्या परिस्थितीत दहशत माजवणाऱ्या किंवा एखाद माणसाला मारणाऱ्या वाघाला पकडण्याची परवानगी PCCF द्वारे लगेच दिली जाते.
हल्लेखोर वाघाची अचूक ओळख पटवण्यासाठी हल्ल्यात मृत झालेल्या व्यक्तीच्या जखमेची नमुने संबंधित RFO द्वारे DNA टेस्टिंग साठी Hydrabad येथील CCMB टेस्टिंग सेंटरमध्ये पाठवले जाते.या या टेस्टिंग मध्ये हल्लेखोर वाघ नर किंवा मादी आहे व हल्लेखोर वाघाची अचूक माहिती मिळते.परंतु या प्रक्रियेला जवळपास एक महिन्याचा कालावधी लागतो.2024 पासून घटनेच्या दोन ते तीन दिवसांच्या कालावधीत हल्लेखोर वाघाला वन विभागाद्वारे जेरबंद करण्यात येत आहे.त्यामुळे नरभक्षक वाघाला जेरबंद करण्यात येते का ? नरभक्ष वाघाच्या जागी दुसऱ्याच वाघालातर जेरबंद करीत नाहीना ?
जेरबंद असलेले सगळेच वाघ नरभक्ष आहेत का ?
असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे.
वल्र्ड वाईड फंड फॉर नेचर यांच्या माहितीनुसार प्रत्येक वाघाच्या अंगावरील पट्टांचा नमुना वेगळा असतो, जसा प्रत्येक माणसाच्या बोटांच्या ठश्याचा नमुना वेगळा असतो.
मादी वाघीण आपल्या पिल्लांशी संवाद साधण्यासाठी कानामागील पांढऱ्या खुणांचा हे संकेत म्हणून वापर करते, जगातील निम्म्याहून अधिक वाघ भारतात आढळतात, ही आपल्या देशाच्या समृद्ध जैवविविधतेची पंत मोठी साक्ष आहे. वाघ गुरगुरणे डरकाळी फोडणे, कण्हणे, फुत्कार काढणे आणि धापा टाकण्यासारख्या विविध आवाजांद्वारे संवाद साधतात. शास्त्रज्ञांच्या मते वाघ सुमारे २० लाख वर्षांपासून पृथ्वीवर अस्तित्वात आहेत. मात्र, गेल्या शंभर वर्षांत मानवी हस्तक्षेप, जंगलतोड आणि अवैध घ शिकारीमुळे त्यांच्या संख्येत सुमारे ९७हा टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे त्यांना रण संकटग्रस्त प्रजाती मानले जाते. आजही ही अवैध शिकार हा त्यांच्या अस्तित्वासमोरील पंत सर्वात मोठा धोका आहे. वन्यजीव आणि मानव संघर्ष हा फार वाढलेला दिसत आहे.