बामणी येथे आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त ६४ रक्तदात्यांनी केले रक्तदान
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त बामणी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
मा. सुधीरभाऊ यांच्या ६४ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत ६४ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिला. "रक्तदान हेच श्रेष्ठ दान" या संदेशाला प्रतिसाद देत रक्तदाते स्वतःहून उपस्थित झाले आणि या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. चंद्रकांत देऊळकर, उपाध्यक्ष श्री. देबाशिश सिंग, महामंत्री श्री. रूमदेव देरकर, श्री. प्रकाश मुडपल्लीवार, श्री. अंकित ढवस, श्री. ओम कामडे, श्री. महेश तुराणकर तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या समाजोपयोगी उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व ६४ रक्तदात्यांचे, आयोजकांचे आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. आपल्या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होणार आहे.
"रक्तदान हेच श्रेष्ठ दान – रक्तदान करा, जीवन वाचवा!"
