'आई' विना चार बछडे झाली पोरकी ; नरभक्षी T-120 वाघिण जेरबंद!
दिनचर्या न्युज :-
ब्रम्हपुरी (चंद्रपूर): -
वनजीव व मानव संघर्ष हा काही आता नवीन राहिलेला नाही' 'रोज मरे त्याला कोण रडे' अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. काही दिवसापूर्वीच दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा व आवळगाव परिसरातील बल्लारपूर जंगल क्षेत्रात राणभाजी तोडण्यासाठी गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता.अखेर वन विभागाने दि 29 जुलै ला नारभक्ष T- 120 वाघीणला जेरबंद केले असून तिच्या बछड्यांना जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्न करीत आहे. मात्र आता सध्या ते चार 'बछडे' आपल्या 'आई' पासून पोरखी झाली आहेत.
रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या अनिल दिवटेला T-120 वाघिणीने हल्ला करून ठार केले होते.वन विभागाने दिलेल्या माहिती नुसार सदर वाघिणीने 2025 ला केलेल्या हल्ल्यात दोन ते तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता.मागील वर्षी PCCF द्वारे हल्लेखोर वाघिणीला पकडण्याची परवानगी ब्रम्हपुरी वन विभागाला दिली होती.त्यानुसार वाघिणीला जेरबंद करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली होती. परन्तु त्यावेळी ही वाघीण प्रेग्नंट असल्याचे आढळल्याने ही मोहीम थांबवण्यात आली होती.काही महिन्यांपूर्वी सदर वाघीण अंदाजे तीन महिन्यांच्या चार बछड्यांसह जंगलात आढळली ,परंतु बछडे छोटे असल्यामुळे तिला जेरबंद करण्याचे टाळण्यात आले.दरम्यान वाघिणीने अनेक गाई,बैलावर हल्ले करून ठार केले होते.
9 जुलै ला या वाघिणीने राणभाजी तोडण्यासाठी जंगलात गेलेल्या अनिलला हल्ला करून ठार केले. हल्लेखोर वाघीचा 10 महिन्यांच्या चार बचड्यां सह जंगल परिसरातील शेत शिवारात वावर होता. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हल्लेखोर वाघिणीला पकडण्यासाठी मागील पंधरा दिवसापासून मोहीम राबवली जात होती,दरम्यान TATR येथील T- 203F S 2 वाघाला बेशुद्ध करण्यासाठी डॉट मारले असता त्याचा पाण्याच्या डबक्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली.घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी मोहीम पुढे ढकलण्यात आली होती.अखेर वन विभागाच्या टीमने नियतक्षेत्र हळदा मधील कक्ष क्र.222 मध्ये शूटर अजय मराठे द्वारा डॉर्ट मारून वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले.
'बछडे आईपासून पोरकी'!
वाघीण जेरबंद झाल्यानंतर तिचे चार बछडे आईपासून पोरकी झाले आहे. विभाग तिच्या10 महिन्याच्या चार बछड्यांना जेरबंद करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सतत होणाऱ्या पावसामुळे व्यत्यय निर्माण होत आहे .या मोहिमेत चंद्रपूर येथील STPF टीम , RFO सह 50 वर PRT मेम्बर व वन विभागाचे कर्मचारी प्रयत्न करीत आहे.
PCCF कडून मिळालेल्या परवानगी नंतर वाघिणीला जेरबंद केले असून तिच्या बछड्यांना पकडण्यासाठी मोहीम राबविण्यात आली आहे.वाघीण व बछड्यांना जेरबंद करून DCF , Bramhapuri यांच्या निर्देशानुसार स्थानांतरित करण्यात येईल.
अरविंद जे.ACF (T & Wildlife)
मागील दोन वर्षात नागरिकांवर हल्ला करून मारणाऱ्या 28 नरभक्ष वाघांना वन विभागाने चंद्रपुरातील TTC सेंटर व इतर वन परीक्षेत्रात पिंजऱ्यात जेरबंद करून ठेवण्यात आले .TTC सेंटर ला ठेवलेल्या वाघांमध्ये 6 बछडे, 4 नर वाघ व 3 मादी वाघांचा समावेश आहे.जागेच्या अभावी इतर वाघांना दुसऱ्या जिल्ह्यातील TTC सेंटरला स्थानांतरित करण्यात आले आहे. असे असले तरी जेरबंद करणे म्हणजे त्याना त्यांच्या अधिवास स्वातंत्र्यावर गदा आणणे होय !
