मोकाट कुत्र्यांने तब्बल ५२ नागरिकांना घेतला चावा, नागरिकात भीतीचे वातावरण!
आयुक्तांचे बेजबाबदारपणाचे उत्तर..! काय म्हणाले वाचा!
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर - चंद्रपूर शहरातील छत्रपती नगर भागातील नागरिक मोकाट कुत्र्यांपासून त्रस्त झाले आहे. या भागात एका मोकाट कुत्र्याने तब्ब्ल 52 नागरिकांना चावा घेतल्याची बाब उघडकीस आली आहे. याबाबत नागरिकांनी शिवसेना महानगर प्रमुख माजी नगरसेवक सुरेश पचारे यांच्या माध्यमातून मनपा प्रशासनाला निवेदन दिले मनपा प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले.
मोकाट कुत्र्याची समस्या आता वाढली असून नागरिकांना घराबाहेर पडताना हातात काठी घेऊन निघावे लागत आहे.
तक्रारी केल्यावर मनपा फक्त कुत्रे पकडणारी गाडी त्या भागात पाठविते, कुत्र्यांना पकडल्यावर सायंकाळी ते परत येत असतात त्यामुळे आता छत्रपती नगर भागात कुत्र्यांचा समूह तयार झाला आहे.
चंद्रपूर मनपाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा असे निवेदन आज शिवसेना उबाठा तर्फे माजी नगरसेवक व महानगर प्रमुख सुरेश पचारे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे व अजय कोंडावार उपशहर प्रमुख यांनी दिले.
विशेष बाब म्हणजे निवेदन दिल्यावर आयुक्त अकनूरी यांनी बेजबाबदारपणाचे उत्तर दिले. ते म्हणाले कि, त्या भागातील सर्व कुत्र्यांचे लसीकरण झाले आहे, यावर पुढे आम्ही काही करू शकत नाही. अशा प्रकारचे बेजबाबदारपणाचे उत्तर आयुक्तांकडून ऐकायला मिळाले.
यावेळेस विजय वेलपुलवार, प्रमोद टेपलवार, शंकर पचारे, सुरेश खोब्रागडे,चंद्रया पेंदंतीवार, उपस्थित होते.
