आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त वरोऱ्यात भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिर
६८५ रुग्णांची तपासणी; १०८ शस्त्रक्रियांसाठी नोंदणी, ९८ आयुष्मान कार्ड तयार; दोन व्हीलचेअर व दोन वॉकरचे वाटप
दिनचर्या न्युज :-
वरोरा प्रतिनिधी :
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त स्व. चंद्रभागाबाई नारायण घुमे बहुउद्देशीय संस्था, वरोरा यांच्या वतीने आयोजित भव्य महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्थानिक साई मंगल कार्यालय येथे१ ऑगस्ट रोज शनिवारला पार पडलेल्या या शिबिरात ६८५ रुग्णांची विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या १०८ रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी नोंदणी करण्यात आली, तर ९८ नागरिकांचे आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार करण देवतळे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे होत्या.
यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा भाजप वैद्यकीय आघाडीचे चंद्रपूर जिल्हा संयोजक डॉ. सागर वझे, नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा तेलतुंबडे, संस्थेचे अध्यक्ष मारोतराव घुमे, नगरसेविका मनीषा संजय दानव, चंद्रपूर जिल्हा सहकार बोर्डाचे अध्यक्ष वसंतराव विधाते, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब भागडे, डॉ. भगवान गायकवाड तसेच सामाजिक कार्यकर्ते अमित चवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरासाठी शालिनीताई मेघे रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक सहभागी झाले होते. सर्जरी, बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, अस्थिरोग, त्वचारोग आदी विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक औषधांचे मोफत वितरण केले. शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या १०८ रुग्णांची नोंदणी करण्यात आली.
उपजिल्हा रुग्णालय, वरोरा यांच्या सहकार्याने विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. तसेच आभा कार्ड व आयुष्मान भारत कार्ड तयार करण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. शिबिरादरम्यान दोन गरजू दिव्यांग लाभार्थ्यांना व्हीलचेअर तसेच दोन गरजू लाभार्थ्यांना वॉकरचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात आनंदवनचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पोळ यांचा कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. तसेच दिव्यांगांच्या सामूहिक विवाह उपक्रमासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आस्था बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, वरोरा संचलित स्व. गौरवबाबू पुगलिया दिव्यांग उपवर-वधू सूचक केंद्राचे शामबाबूजी पुगलिया व त्यांच्या सहकाऱ्यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतात समाजातील सर्वसामान्य व गरजू नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता अधोरेखित केली. आरोग्य सेवा हीच खरी समाजसेवा असून लोकहिताचे उपक्रम सातत्याने राबविणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक टिपले यांनी केले, तर आभार तुषार किनाके यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे सचिव आशिष घुमे, उपाध्यक्ष संजय दानव, सूरज घुमे, राहुल भोयर, टेमदेव नागपुरे, रमेश वाटकर, हर्षल दानव, अरुणा जांभुळकर, कोमल फरकडे, सुनील इंगळे, अजय बावणे, फिरोज शेख, सुधाकर सोयाम, सागर आत्राम, चेतन बुरडकर, छाया चव्हाण, ज्योती किटे, बबली डाहुले, सविता मोदी, सुरेखा मडावी, स्वप्नील लिहितकर, शंकर आत्राम, अनिकेत कुळसंगे, अनिकेत दातारकर, नूतन बुरडकर, पवन गुरुनुले, प्रशांत साळवे, योगेश क्षीरसागर, श्रीकांत आत्राम, आशिष करडभुजे, सुभाष दांडेकर, मयूर साळवे, अभिषेक भागडे, आदेश किनाके, सार्थक नागपुरे, ओम मोहिनकर, शुभम ढाले, प्रकाश कांबळे, रुपेश पचारे तसेच कल्याणेश्वर गणेश मंडळाचे कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक यांनी विशेष परिश्रम घेतले.
समाजातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या महाआरोग्य व मोफत शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
