जुनोना वनपरिक्षेत्रात सांबराचे मांस हस्तगत , आरोपी फरार
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर एफ डी सी एम अंतर्गत येणाऱ्या वनपरिक्षेत्रात आज सकाळी काही व्यक्तीने सांबराची शिकार करून त्याचे मांस विकत असल्याची खबर वन विभागाच्या अधिकाऱ्यांना लागली. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी पोहोचतात अज्ञात व्यक्तीने सांबराचे मांस आणि सायकल टाकून पळ काढला. वन विभागाकडून सांबराचे हस्तगत करण्यात आले असून आरोपी फरार झाले आहे.
परिसरातील सीसीटीव्ही कुठेच तपासणी सुरू असून फरार झालेल्या आरोपीचा शोध वन विभागाकडून घेणे सुरू आहे.
अशी माहिती एफ डी सी एम च्या अधिकाऱ्याकडून मिळाली.
चंद्रपूर शहराला लागून असलेल्या जुनोना वनपरिक्षेत्रात वन्य प्राण्याची शिकार नेहमीच होत असून यापूर्वीही या वनपरिक्षेत्रात वन प्राण्याची शिकार करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती.
वारंवार होत असलेल्या वनप्राण्याच्या शिकारीवरून वन विभागाच्या कार्यसमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सांबराची शिकार करणे हा कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे. भारत सरकारने सांबर (Sambar deer) या प्राण्याला 'वन्यजीव संरक्षण कायदा १९७२' (Wildlife Protection Act, 1972) अंतर्गत संरक्षित केले आहे। सांबराची शिकार करणे किंवा त्याचे मांस बाळगणे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे प्रतिबंधित आहे।
