गडपिपरी ते गोठणगाव मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे व पुलाचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे, एकाच पावसात पूल दबला !



गडपिपरी ते गोठणगाव मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील रस्त्याचे व पुलाचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे, एकाच पावसात पूल दबला !


दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर:- प्रतिनिधी -
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका येत असलेल्या
गडपिपरी ते गोठंगाव येथील रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत प्रजिमा 67 ते महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था चंद्रपूर द्वारे करण्यात येत आहे. हे काम नागपूर येथील एन. एन. पुगलीया या कंपनीच्या कंत्राटदाराला करण्यात आले आहे.
या रस्त्याची लांबी ३.२४ किलोमीटर असून कामाची सुरू करण्याची दिनांक ६ /९ /२०२३ होती तर काम पूर्ण करण्याची अवधी दिनांक ५/९ /२०२४ या तारखेपर्यंत असताना ती वाढीव करून आज पर्यंत या रस्त्याचे काम पूर्णत्वास गेले नाही. या कामाची करारनामा किंमत १८८.३६ लक्ष असून देखभाल दुरुस्ती किंमत २०.६१ लक्ष असून या रस्त्याचे दर्जोन्नतीकरण व डांबरीकरण तसेच सिमेंट काँक्रेट रस्ता २९५ मीटर असताना मागील चार वर्षापासून या रस्त्याचे काम या कंत्राटदाराकडून अनियमितेत होत आहे. या रस्त्यावरील पुलाचे काम मार्च 2026 पर्यंत किंवा त्या पुढील महिन्यापर्यंत करण्यात आले. काम झाल्याचा दिखावा करून रस्त्यावर फलक सुद्धा लावण्यात आले. मात्र प्रत्यक्ष दर्शनी त्या रस्त्याच्या कामाचा दर्जा अतिशय खराब असून मोजमाप पुस्तका व अंदाजपत्रक नुसार काम केल्याचे दिसून येत नाहीत.

 
 याच रस्त्यावर बांधण्यात आलेल्या  पुलाची एकाच पावसात खस्ता हालत झाली आहे. यावरून हे बांधकाम किती निष्कृष्ट दर्जाचे झाले, हे सांगण्याची गरज नाही. प्रत्यक्ष दर्शनी गावकरी आणि माध्यमाने या ठिकाणी पहाणी केली असता पुलाची दोन्ही बाजूंनी  माती दाबल्या गेल्याने पुलाला भेगायी पडल्या आहेत. मोठा पाऊस  झाल्यास  हा पूल वाहत जाण्याची दाट शक्यता आहे. करोडो रुपये लावून रस्ता व पुल याचे काम करण्यात आले. मात्र कंत्राटदार आणि अभियंता  यांच्या लापरवाहीने हे काम निष्कृष्ट झाल्याचे दिसून येत आहे. संबंधित  वरिष्ठ अधिकाऱ्यांनी झालेल्या कामाची चौकशी करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अभियंत्यावर कारवाई करण्यात यावे, तसेच संबंधित रस्ता पुन्हा
मोजमाप पुस्तका त्यानुसार  काम  करण्याची गुणवत्ता, व कामात पारदर्शकता, गुणवत्तापूर्ण काम होणे. जसे की,
GSB  20  cm, WBM  7.5 cm, MPM  5.cm, 
2 cm, कास्फेट डांबर करून ते काम पूर्ण   म्हणजे  34.5. Cm. सेंटीमीटर  याप्रमाणे  करण्यात यावे. अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे.



 मागील तीन महिन्यापूर्वीच या रस्त्याच्या कामा संदर्भाची तक्रार जिल्हाधिकारी यांना करण्यात आली होती. परंतु संबंधित  विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची दिशाभूल करून अहवाल सादर केले.  आता एकाच पावसात पूल खसल्याने  बांधकामाचा दर्जा निष्कृष्ट झाल्याचे दिसून आले. आता याकडे  जिल्हा प्रशासन, व संबंधित विभागातील अधीक्षक अभियंता  काय कारवाई करतात  याकडे एक नागरिकांचे लक्ष लागले आहे.