कल्पना पोतर्लावार यांच्या पुढाकाराने प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात बल्लारपूर पोलिसांना निवेदन




कल्पना पोतर्लावार यांच्या पुढाकाराने प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटख्याच्या अवैध विक्रीविरोधात बल्लारपूर पोलिसांना निवेदन

दिनचर्या न्युज :-
बल्लारपुर : बल्लारपुर शहर व परिसरात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम विक्री, साठवणूक व वितरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तालुका अध्यक्ष कल्पना पोतर्लावार यांच्या पुढाकाराने आज पोलीस स्टेशन बल्लारपुर येथे निवेदन देण्यात आले.

यावेळी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ठिकाणांची तातडीने तपासणी करून संबंधित पदार्थ जप्त करण्यात यावेत. तसेच हे पदार्थ कोठून येतात, कोण पुरवठा करतो आणि कोणाच्या माध्यमातून त्यांचे वितरण केले जाते, याचा सखोल तपास करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
दोषी आढळणाऱ्या विक्रेते, साठवणूकदार व पुरवठादारांविरुद्ध लागू कायद्यानुसार कठोर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कल्पना पोतर्लावार यांनी केली.
“आपल्या युवकांच्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे.
प्रशासनाने तातडीने विशेष तपासणी मोहीम राबवून या अवैध विक्रीला आळा घालावा, हीच आमची ठाम मागणी आहे,” असे कल्पना पोतर्लावार यांनी सांगितले.
यावेळी मनसैनिक संपदा वर्मा, ज्योती बाहुरिया, राणी दसरवार, शकुना बाहुरिया आणि कामाला पुल्लूरवार उपस्थित होते.