भिवापुरातील प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार गहू- तांदूळ बिनधास्त विकतात ! पुरवठा अधिकाऱ्यांचे स्वस्त धान्य दुकानदारांना अभय! chandrapur




भिवापुरातील प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार गहू- तांदूळ बिनधास्त विकतात !

पुरवठा अधिकाऱ्यांचे स्वस्त धान्य दुकानदारांना अभय!

दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर प्रतिनिधी
जिल्ह्यातील प्राधिकृत राशन धारकांना गोरगरिबांसाठी राशन शासनाकडून मिळत असते. अल्प दरात , एपीएल बीपीएल, केसरी धारकांना गहू तांदळाचा वाटप शासनाकडून करण्यात येते. भिवापूर वार्डातील , ए. के. दंडमवार आणि तळोधीकर यांच्या प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानातून सर्रास विक्री होत आहे.
प्राधिकृत स्वस्त धान्य दुकानदार शासनाकडून मिळणारे गहू तांदूळ सर्रास काळाबाजार बाजारात विक्री करताना दिसतात. त्याकडून केसरी, पांढरा, पिवळा, बीपीएल अशा कार्डधारकांना शासनाकडून अन्नपुरवठा म्हणून शासकीय स्वस्त धान्य दुकानदाराकडून मापक दरात राशन दिल्या जातो. याच राशनचा   प्राधिकृत दुकानदार गोरगरिबांना मिळणारा धान्य सर्रास दलालाच्या, मेस वाल्यांच्या, गावात फिरून गोळा करून सर्रास शासकीय धान्य  विकत घेणाऱ्या  दलाला विकतात. शासनाकडून दोन पाच रुपयात मिळणारे धान्य सर्रास दुकानदार 20 ते 25 रुपये किलो भावाने विक्री करताना दिसून येतात.
 त्यामुळे शासनाने गोरगरिबाच्या अन्नधान्यावर डल्ला मारणाऱ्या दुकानदारावर कडक कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात यावे व सामान्य जनतेला न्याय द्यावा  अशी जनतेकडूनच मागणी होत आहे.
 एकीकडे शाळेतील मध्यांती भोजन विद्यार्थ्यांचे बंद केले जाते, अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना धान्य नसल्याचा बहाणा करून शासन पुरवठा करीत नाही  बालकास सकस आहारापासून वंचित ठेवतात. इकडे मात्र सर्रास स्वस्त राशन दुकानदार खुल्या बाजारात अवैध्य मार्गाने राशन विकतात. यातील अनेक दुकानदार वाटप  झाल्यावर राहिलेला माल  दलालालना ऑटोद्वारे सर्रास विकतात. या संदर्भाची माहिती पुरवठा अधिकाऱ्यांना  देऊन सुद्धा कुठलीही कारवाई करीत नसतात, यामुळे या स्वस्त राशन दुकानदारांना यांचे अभय  आहेत काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.