चंद्रपुरात मंडल यात्रेचा समारोप, ओबीसी अजूनही झोपलेलाच !!



चंद्रपुरात मंडल यात्रेचा समारोप, ओबीसी अजूनही झोपलेलाच !!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर : सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने ओबीसींच्या जातिनिहाय जनगणनेसाठी आयोजित मंडल यात्रेचा समारोप ९ ऑगस्ट रोजी चंद्रपुरात करण्यात आला.
मंडल यात्रेचे स्वागत शिवाजी चौक येथे करण्यात आले. ज्या समाजाच्या हक्कासाठी ही मंडल यात्रा काढण्यात आली, त्या ओबीसी समाजाचे स्वागतासाठी शेकडो कार्यकर्तेही नव्हते, यावरून ओबीसी समाज किती जागृत असेल याची कल्पनाच न केलेली बरी!
अजूनही ओबीसी समाज झोपलेलाच असल्याचे दिसून आले! या कार्यक्रमाची सांगता प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात करण्यात आली. यावेळी ओबीसी नेते आमदार विजय वडेट्टीवार यांची उपस्थिती होती. वेळ आल्यास नेपाळ सारखा उपकप्तान व्हावे लागेल, माझे बालपण संघर्ष आणि लढवयातच गेले. मागून मिळत नसेल तर आपल्या हक्काच्या लढ्यासाठी, पदाची लालचा न करता ओबीसी हक्कासाठी लढणे हेच माझे परम कर्तव्य असेल!
प्रसिद्ध कवी व व्याख्याते नितीन चंदनशिवे यांचे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यांनी आपल्या कवी रूपातून आत्ताच्या सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले. सकल ओबीसी महामोर्चा चे मुख्य संयोजक उमेश कोराम त्यांना उपस्थिताना मार्गदर्शन करताना म्हणाले की, सरकारचीच आपल्याला अंतिम यात्रा काढायची आहे. आरएस आणि मनुवादी, मनुस्मृतीचा  विचार संपल्याशिवाय ओबीसीला न्याय मिळणार नाही.
ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल डहाके  यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणातून  आपल्या हक्कासाठी आता ओबीसीला रस्त्यावर उतरावे लागेल तरच ओबीसीची जातनिहाय जनगणना  सरकार करेल  असे त्यांनी म्हटले.
४ ऑगस्ट रोजी भंडारा येथून या मंडल यात्रेला सुरुवात झाली असून विदर्भातील विविध जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर ९ ऑगस्टला ही यात्रा चंद्रपुरात दाखल  झाली .
मंडल दिवस हाकेवळ आरक्षणाचा नसून सामाजिक न्याय, समान संधी आणि वंचितांच्या सन्मानाचा दिवस आहे. त्यामुळे या ऐतिहासिक कार्यक्रमाला नागरिक व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे  आव्हान करण्यात आले होते.
परंतु या मंडळ यात्रेच्या समारोह  कार्यक्रमात, ओबीसी समाजातील इतरही घटकातील स्वयंघोषित ओबीसी यानी कार्यक्रमाकडे पाठ  फिरवल्याचे दिसून आले.
यावरून ओबीसी समाज अजूनही झोपलेल्या स्थितीत आहे, हे या कार्यक्रमातून दिसून आले.
   'उठ ओबीसी जागा हो' संघर्षाचा धागा हो' असे झळकणारे आवाज आणि बॅनर! तेवढेच  सीमित राहिले.
काँग्रेसमधीलच ओबीसी चे कार्यकर्ते, या ठिकाणी आवर्जून दिसून येत होते. मात्र इतर घटकातील ओबीसी चळवळतील  इतर समाजाच्या  पदाधिकाऱ्यांना  स्थान नसल्याचे दिसून आले. यावरून ओबीसी समाजाचे काय? असा प्रश्न मात्र आता उपस्थित होत आहे. अशीच परिस्थिती राहिली तर ओबीसीच्या गटातटातील वाद
यामुळे होणारे ओबीसीचे नुकसान  येणाऱ्या पिढीला भोगावे लागणार आहेत.