चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले!

चंद्रपूर शहरातील गजबजलेल्या ठिकाणी गोळीबार, शहर हादरले!



दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चंद्रपूर शहराने आज भर दिवसा गोळीबाराचा थरार अनुभवला असुन शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका हॉटेलमधे एका बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार करून एका व्यक्तीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची खळबळजनक घटना घडली आहवि

स्तर वृत्त असे की चंद्रपूर शहरातील आझाद बगीचाच्या बाजुला असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे असलेल्या हॉटेल मधे आज्ञात बुरखाधारी व्यक्तीने गोळीबार केला ह्यात अनडेवार नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला असुन त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर युवकास एका युवतीने हॉटेल मधे भेटायला बोलावले होते आणि तिथेच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला ह्यात त्या युवतीची भुमिका संशयाची असल्याचे प्रथमदर्शनी आढळून येत आहे हे विशेष.

गोळीबार होताच सदर व्यक्ती स्वतःचा जीव वाचविण्यासाठी शेजारीच असलेल्या एम आय मोबाईल शोरूम मधे दडून बसला. दरम्यान आरोपी पळुन जाण्यात यशस्वी ठरला असुन ह्या प्रकरणाचे तार बल्लारपूर शहराशी जोडल्या गेले असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर, शहर पोलीस निरीक्षक आंबोरे व पोलीस टीम मोक्यावर दाखल झाली असुन पोलीस कारवाई सुरू आहे.