अन! त्या खुनात मैत्रीणच निघाली खुनी!




अन! त्या खुनात मैत्रीणच निघाली खुनी!

भद्रावती येथील बहुचर्चित खून प्रकरणाचा पडदा पाश!

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
भद्रावती तालुक्यातील सूमठाणा तेलवासा मार्गावर एका लेआउट मध्ये सापडलेल्या तरुणीचा मृतदेह प्रकरणी पोलिसांनी आरोपींपर्यंत पोचाचा प्रयत्न केलेला आहे. त्या घटनेचा उलगडा करण्यासाठी मागील आठवडाभरापासून जिल्हा पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात होते. यातच या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीला ताब्यात घेण्यात आली असून तिनेच अपमानाचा बदला घेण्यासाठी खून केल्याचा संशय आहे.

मृतक व आरोपी हे दोघी रूममेट होत्या. काही महिन्यांपूर्वी या दोघींमध्ये काही कारणावरून भांडण झाले. तेव्हापासून आरोपी मैत्रिणीचा इतर मैत्रिणींसमोर अपमान करीत होती. वारंवार होणारा अपमान बघता मृतक युवतीच्या मैत्रिणीने तिला अद्दल घडवायचे ठरविले. तिने तिचे (अन्य आरोपी हे गोष्ट सांगीतली. दोघांनी एकत्रीत मयताला जिवे मारण्याचा कट रचला.
. त्याप्रमाणे मयताला ताब्यात घेतलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाने दिनांक 03/04/2022 रोजी रात्री 08 वाजता वरोरा नाका येथे बोलवून घेतले. त्या ठिकाणावरून तिने व आरोपीने तिला मोटार सायकलवर बसवून घटनास्थळी घेवून गेले. रात्री 12:00 वा . सुमारास घटनास्थळी निर्जनस्थळी नेवून विधीसंघर्षग्रस्त बालकाने मयताला मारहाण करून जमिनिवर खाली पाडले. नंतर तिचे पाय प्रकडून मांडीवर वार केले. सदर वेळी अन्य आरोपी मयताचेपोटावर बसून  प्रथम गळा दाबन खुन केला. नंतर तिची धारधार शस्त्राने गळा कापला.
ओळख पटू नये म्हणून दोघांनीही दोघाच्याही चाकूने आळी पाळीने मयताचा गळा कापला. तसेच मयताचे पुर्ण कपडे व मुडके घेवून मोटर सायकलवरून पसार झाले.

दि. 04 एप्रिल 2022 रोजी पहाटे दरम्यान पोलीस स्टेशन भद्रावती हद्दीत भद्रावती ते तलसा रोड मायक्रॉन शाळे मागील पडीत शेत शिवारात अंदाजे 20 से 22 वर्षीय युवती मुंडके कापून निर्घृण हत्या करून निर्वस्त्र स्थितीत मिळून आली होती. तिचे शरीराला मुंडके (शिर) नव्हते. कोणीतरी अज्ञात इसमाने सदर युवतीच्या खुन करून तिची ओळख पटु नये म्हणून तिथे मुंडके शरीरापासुन वेगळे करून तिचे मृत शरीर निर्वस्त्र अवस्थेत ठेवले. यावरून पोलीस स्टेशन भद्रावती येथे अज्ञात इसमाविरूद्ध अपराध क्रमांक 141 / 2022 कलम 302, 201 मा दं.वि.चा गुन्हा नोंदविण्यात आला.

सदर खुनातील आरोपी शोधण्याचे स्थानिक गुन्हे शाखा तसेच भद्रावती पोलीस स्टेशन, सायबर सेल चे विविध पथक मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात तपास करीत आहेत.

मयत मृतदेहाची ओळख पटविण्याची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री अरविंद साळवे व अपर पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे, पोउपनि अतुल कावळे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार व सायबर सेल चे सायबर एक्सपर्ट मुजावर अली, वैभव पत्तीवार, राहुल पोंदे, भास्कर चिंचवलकर, संतोष पानघाटे व उमेश रोडे यांनी केली.