राज्यात 18 जिल्ह्यात अनलॉक, आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा निर्णय जाहीर!







राज्यात 18 जिल्ह्यात अनलॉक, आपत्ती व्यवस्थापनाचा मोठा निर्णय जाहीर!

महाराष्ट्र राज्य (मुंबई
दिनचर्या न्युज :-

: राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना टक्केवारी कमी आहे. त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार असल्याची घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते मुंबईत पत्रकार 5 percent positivity rate disaster

Open in app चा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी त्या ठिकाणी अनलॉक राहणार आहे. असे राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा आणि इयत्ता १२ वीच्या परीक्षेबाबतचा निर्णय घेण्यासाठी राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आज मुख्यमंत्री
राज्यातील अनलॉकची विभागणी पाच स्तरांवर करण्यात आली आहे. यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आणि एकूण ऑक्सिजन बेड्स २५ टक्के व्यापलेले असतील अशा ठिकाणी पूर्णपणे अनलॉक करण्यात येणार आहे. यात सर्व दुकानं, गार्डन, सलून, थिएटर्स, मनोरंजनाची एकूण १८ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. धुळे, औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ याठिकाणी आता पूर्णपणे अनलॉक
करण्यात येणार आहे. याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार आहे.

अनलॉकचे एकूण पाच स्तर नेमके कोणते? पहिला स्तर- पूर्णपणे अनलॉक: पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्के, तसेच ऑक्सिजन बेड 25 टक्क्यांपेक्षा कमी व्यापलेले असावेत.

दुसरा स्तर- मर्यादित स्वरुपात अनलॉक: पॉझिटिव्हीटी रेट 5 टक्के ऑक्सिजन बेड्स 25 ते 40 टक्क्यांदरम्यान व्यापलेले असावेत

तिसरा स्तर- निर्बंधासह अनलॉक: पॉझिटिव्हीटी रेट 5 ते 10 टक्के असावा. ऑक्सिजन बेड्स हे 40 टक्क्यांपेक्षा जास्त व्यापलेले असतील

चौथा स्तर निर्बंध कायम: पॉझिटिव्हीटी रेट 10 ते 20 टक्के असेल. तसेच येथे ऑक्सिजनचे बेड 60 टक्क्यांच्या वर व्यापलेले असतील

20 टक्क्यांच्या वर आणि ऑक्सिजन बेड हे 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात व्यापलेले असतील

मुंबई लोकलचं काय?

मुंबईचा दुसऱ्या स्तरामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईत सध्यातरी लोकल सेवा सुरू होणार नाही, अशी माहिती वडेट्टीवार यांनी दिली आहे. पण येत्या आठवड्यात रुग्णांची संख्या कमी झाली तर लोकल संदर्भातही निर्णय घेतला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसऱ्या स्तरामध्ये

मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्याचा समावेश आहे. पहिल्या स्तरात पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्के असलेल्या १८
जिल्ह्यात या गोष्टी सुरु
रेस्टॉरंट, मॉल्स
गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील
खाजगी, सरकारी कार्यालये 100 टक्के सुरू होतील
चित्रपट शुटींगला परवानगी
थिएटर सुरू होतील
सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना 100 टक्के सुट दिलीआहे.
ई कॉमर्स सुरू राहिल जिम, सलून सुरू राहणार.
पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही.