पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध संतापजनक भाषा वापरणाऱ्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा---- भारतीय जनता पार्टी वरोरा यांची मागणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध संतापजनक भाषा वापरणाऱ्या काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आ. नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करा---- भारतीय जनता पार्टी वरोरा यांची मागणी

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
17 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीची जाहीर सभा आटोपल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना 'मी मोदीला मारू शकतो, त्यांना शिवा देऊ शकतो' असे घृणास्पद वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी जाहीर रित्या केले. या प्रकरणी नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन दि.18 जानेवारी ला भारतीय जनता पक्षा चा वतीने वरोरा शहराचे पोलीस निरीक्षक मा.खोब्रागडे साहेब यांना पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आले*....
पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे भारत देशाचे पंतप्रधान आहे. देशातील प्रमुख पदावर असलेल्या व्यक्ती बद्दल असे घृणास्पद वक्तव्य करणे हे निंदनीय आहे. या प्रकारचे वक्तव्य करून नाना पटोले यांनी खालची पातळी गाठली असून काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना मारण्याचा कट रचला जात आहे. हे एक प्रकार सिद्ध केले आहे देशाच्या पंतप्रधान विषयी असे वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांना अटक करावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.  
         या प्रसंगी निवेदन देताना अहेतेशाम अली- माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा सचिव भाजपा, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भागडे,शहराचे अध्यक्ष सुरेश महाजन*, *विनोद लोहकरे, राजू दोडके, दिलीप घोरपडे, महेश श्रीरंग,संजय राम, राजेश साकोरे ,जगन ढाकणे,आशिष रणदिवे, राहुल दागमवार*, *राहुल बांदूरकर, अभिजीत गयेनेवार, रमेश पर्बत,एल आर ढोबळे,ओम यादव,विशाल कुडमेथे,या सर्वांची उपस्थिती होती*...!

दिनचर्या न्युज