ओबीसी बचाव परिषदेच्या नेतृत्वासंदर्भात संभ्रम !

ओबीसी बचाव परिषदेच्या नेतृत्वासंदर्भात संभ्रम !

ओबीसी समाजातील अनेक समाज अध्यक्षाना डावले....

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : चंद्रपुरात स्वयंघोषित ओबीसी नेतृत्व समजणाऱ्या नेत्यांनी रविवारी ओबीसी बचाव परिषदेचे आयोजन केले आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील ओबीसी समाजातील विविध जातीच्या अध्यक्षांना या परिषदेपासून दूर ठेवल्याने ओबीसी नेतृत्वाच्या स्वयंघोषित नेत्यावर संभ्रम निर्माण होत आहे. म्हणून या परिषदेकडे काही ओबीसी घटकातील अध्यक्षांनी परिस्थितीकडे पाठ फिरवल्याची चर्चा होत आहे.
सध्या विदर्भात नागपूर येथे महाराष्ट्र राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. राज्यामध्ये ओबीसी मराठा समाजाचे आपापल्या नेतृत्वासाठी, आरक्षण मिळावे म्हणून दोन समाजात सध्या संघर्ष सुरू आहे.
यासाठी ओबीसी समाजातून मराठ्यांना आरक्षण देऊ नये, त्यांना वेगळे आरक्षण द्यावे या मागणीसाठी
रवींद्र टोंगे यांनी आमरण उपोषण केले होते. यात जिल्ह्यातील सर्व नेतृत्व एकवटले असताना या आंदोलनाकडे स्वयंघोषित ओबीसी नेत्याने सपशेल पाठ फिरवली होती. मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमरण उपोषणाला भेट देऊन उपोषणाची सांगता केली. यावेळी आंदोलन यशस्वी होत असल्याचे पाहून त्या
ठिकाणी मात्र या नेत्यांनी आपली हजेरी लावली फोटो सेशन करून मी त्या आंदोलनाच्याचा खरा पुढारी अशा प्रकारची चित्र काढून घेतली.
चिमूर येथे आठ दिवस अजित सुकारे आणि अक्षय
लांजेवार हे आंदोलन करत होते. मात्र या ओबीसीच्या
आंदोलनाला ओबीसी बचाव परिषद घेणाऱ्यांनी यांनी साधी भेट सुद्धा दिली नाही. आंदोलनात दहा पैकी आठ मागण्या मान्य करून उपोषण सोडले.
आता मात्र स्व: केंद्रित ओबीसी नेता बचाव परिषद घेत आहे.
  सत्ता असली तिकडे फिरकणारा आणि आपल्या हाताखालचे खाजगी  कार्यकर्ते    चटया उचलायला राहतील  अशीच शक्यता आहे. यांनी स्वतःला मोठे दाखवण्याचा प्रयत्न करून राज्यातील नेत्यांना  दाखविले असल्याची चर्चा आता ओबीसी कार्यकर्त्यांमध्ये होत आहे
 
 रवी ठरवतो नेतृत्वाचे अंतिम निर्णय!

 काही दिवसा अगोदरच ओबीसी बचाव  परिषदेसाठी  पत्रकार परिषद घेण्यात आली. मात्र रवीला जे वाटेल त्या पत्रकाराला निमंत्रण देतो .सर्व सर्वस्वी सर्व निर्णय घेण्याचे काम रवी कडेच असतो.  निर्णय अंतिम असल्याने    नेतृत्वालाई रवी प्रकाश देत असेल का आता असा प्रश्न संबंधित चंद्रपूर ओबीसी  समाजात चर्चिला जात आहे. हे नेतृत्व आपल्या नेतृत्वाला दिशा देण्याचे काम करण्याऐवजी वेगळेच काम सुरू असल्याने  याच्या दिवा खालचा अंधार सध्या कुणालाही दिसून येत नाही. मी सांभाळतो, मॅनेज करतो अशा प्रकारची आपली पोळी भाजणारा हा रवी एक दिवस नेतृत्वाला  संपवेल हे नक्कीच ?