गुगलवर जाहिरात व ब्लॉगर तयार करून एमबीबीएसच्या प्रवेशाच्या नावाखाली पालकांची फसवणूक
रामनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल
दिनचर्या न्युज
चंद्रपूर : वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली गुगलवर जाहिरात व ब्लॉग तयार करून चंद्रपुरातील दोन पालकांची ९ लाखाहून अधिक रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात अखेर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
फसवणूक झालेले पालक मागील काही महिन्यापासून रामनगर पोलीस स्टेशनच्या चकरा मारत होते. गुन्हा दाखल करण्यासाठी वारंवार चकरा मारून थकले होते. अखेर पालकांना वरिष्ठाकडे जाऊन तक्रार करावी लागेल का? किंवा ऑनलाईन करावे लागेल.? असे ठमकाऊन सांगितल्यानंतर आम्ही सायंकाळी आपली तक्रार दाखल करतो असे त्या दिवशी पालकांना सांगितले. अखेर रामनगर चे पोलीस निरीक्षक पोलीस निरीक्षक एरकुरे मॅडम यांनी फसवणूक केलेल्या भामट्यांवर गुन्हा दाखल केला.
येथील मंगेश प्रभाकरराव भोंबे (५०) हे मेडिसिन एजन्सी चालवतात. त्यांना आपल्या मुलीला व मित्र शरद रणदिवे यांच्या मुलाला एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा असल्याने, त्यांनी गुगलवर ऑनलाइन कौन्सिलरचा शोध घेतला. शोध घेताना त्यांची ओळख बीड येथील ऑनलाइन कौन्सिलर ओमप्रकाश राठोड आणि त्याचा साथीदार जयपूर, बेंगलोर येथील जोगेंदर सिंग यांच्याशी झाली. आमची थेट सेटिंग असून पॅसिफिक कॉलेज, जयपूर (इस्लामपूर), सांगली येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडीकल सायन्स अॅन्ड रिसर्च येथे कमी खर्चात प्रवेश करून देतो, असे आमिष भोंबे व रणदिवे यांना दाखविले.
सुरुवातीला जयपूर येथील पॅसिफिक डेंटल कॉलेज येथे प्रवेशाच्या नावाने १ लाख रुपये ऑनलाइन वर्ग करून घेण्यात आले. मात्र तेथे प्रवेश न मिळाल्याने संशयितांनी सांगली येथील प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च येथे दोन्ही
मुलांचे एमबीबीएस प्रवेश करून देण्याचे फसवणूक आश्वासन दिले. ओपन आणि ओबीसी प्रवर्गातील प्रवेशासाठी नियमानुसार फी आणि सेटिंगच्या नावाखाली लाखो रुपयांची मागणी करण्यात आली. विश्वास संपादन करण्यासाठी संशयितांनी आधीचे १ लाख रुपये परत केले. त्यानंतर प्रवेश प्रक्रियेच्या नावाने विविध तारखांना भोंबे, त्यांचे भाऊ अमोल कोहळे आणि मित्र गजानन रणदिवे यांच्या बँक खात्यांतून मंगेश भोंबे यांच्याकडून ६ लाख ३० हजार, अमोल कोहळे यांच्याकडून १ लाख आणि गजानन रणदिवे यांच्याकडून १ लाख ६८ हजार असे एकूण ८ लाख ९८ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने उकळले. पैसे देऊनही दोन्ही मुलांचा प्रवेश झाला नाही आणि वारंवार पाठपुरावा करूनही उर्वरित रकमेची मागणी होत राहिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मंगेश भोंबे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी ओमप्रकाश राठोड, रा. बीड व जोगेंद्रसिंग, रा. जयपूर याच्याविरोधात तक्रार दाखल केली. पोलीस या दोन आरोपीविरूध्द माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (ड), भारतीय न्याय संहिता (बीएनएस)२००० कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही ऑनलाईन मध्यस्थांवर किंवा सेटिंग करून प्रवेश देणाऱ्यांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
मात्र आता पोलिसांसमोर या भामट्यांचा शोध घेऊन यांच्यावर कारवाई करावी अशा रॉकेटचा पडदा पास करून फसवणूक झालेल्या पालकांना न्याय मिळेल का याकडे लक्ष लागले आहे.
