..अधीक्षकाच्या आशीर्वादाने वाहतूक निरीक्षकाचे साडेचार वर्ष... !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर वाहतूक पोलीस निरीक्षक शाखेत मागील साडेचार वर्षापासून पोलीस निरीक्षक या पदावर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली . प्रत्येक वाहतूक पोलिसांना ठरलेल्या पॉईंटवर नियुक्ती करण्यात येते. व्यवस्थेचे धडे न देता त्यांच्याकडून प्रत्येकी रोज दहा चालन करण्याचे आदेश प्रमुखांकडून आल्याचे सांगण्यात येते.
वाहतूक नियंत्रण कक्षात असलेल्या दोन नंबरच्या गाडीला हायवेवर पाठवल्या जाते. त्या गाडीकडून पर डे सूत्राच्या माहितीनुसार तीन हजार रुपये हे प्रमुखाकडे जमा करण्याचे खमके आदेश संबंधिताला असतात.
एवढेच नाही तर हायवेवर स्पीड नियंत्रणासाठी इंटरसेप्टर वाहन उपलब्ध असते. वेग प्रतिबंधक यंत्रणासाठी येणारे वहान किती स्पीडची असते त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोग असतो. परंतु वाहतूक विभागाच्या या गाडीचा उपयोग. तसं न करता संबंधित वाहनांना थांबवून त्या गाडीला तुमची चालन झाले आहे. एवढे चालन तुम्हाला आता भरावे लागतील, यासाठी दोन-तीन वाहतूक पोलीस मुख्य रस्त्यावर उभे राहतात. ही गाडी जर अर्धा किलोमीटर वरून इंटरसेप्टर वाहन चालन करत असेल तर, या वाहतूक पोलिसांचे काय काम?
संबंधित वाहन चालकांना प्रलोभन देऊन सर्रास त्या वाहनधारकांकडून दामाजी घेतल्या जात असल्याचा प्रकार चर्चिला जात आहे. मागील साडेचार वर्षांपासून वाहतूक पोलीस निरीक्षण या शाखेत पाटील साहेब यांच पोलीस अधीक्षक यांच्या आशीर्वादाने चांगलंच चांगभल होत आहे? किंवा यांच्यावरही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही दबाव आहे का?
यापूर्वी वाहतूक शाखेतील निरीक्षक राहिलेल्या पदावर एवढे वर्ष कुठलाच वाहतूक पोलीस निरीक्षक एकाच ठिकाणी राहिल्याचे दिसून आले नाहीत. पण पाटील साहेबांचे साडेचार वर्षानंतरही या विभागातील
नियुक्ती का? असा प्रश्न आता सामान्यतः जनतेकडून विचारला जात आहे?
