शिवनीचोर शाळेसमोरील रेती साठा कोणाचा?
गावातील मुकळदमवर महसूल विभाग मेहरबान !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील ,तालुक्यातील अनेक नदी वरील घाटांचे लिलाव झाले नाहीत. वर्धा नदीवरील, शिवनी,मार्डा, पिपरी, धानोरा येथील रेती तस्करांनी उदमाज माजवला आहे. रात्रीचा खेळ या नदीतून सर्रास अवैध्य रेती उपसण्यात जात असते. रात्री उपसलेली रेती शिवनी गावातील शाळेसमोरील पटांगणात रेतीचा साठा साठवला जात असल्याचे दिसून येत आहे. मात्र खनिकर्म विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधली की काय ?असा प्रश्न आता सर्वसामान्य ना पडत आहे. गावातीलच एका मुकळदम असणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींचा हा रेती साठा असल्याचे गुपित सांगितल्या जात आहे. एवढेच नाही तर या नदीवरील शिवनी, मारडा गावातील तस्करांनी उमाद माजवला आहे. सर्रास रेतीची तस्करी करून शासनाचा लाखोचा महसूल बुडवल्या जात आहे. काही दिवसापूर्वीच या नदी घाटावरील रस्ता महसूल प्रशासनाने खोदून बंद केला होता. परंतु रेती तस्करांनी आर्थिक व्यवहार करून पुन्हा तो रस्ता सुरू केल्याने रेतीची सर्रास चोरटी वाहतूक केली जात आहे. या सर्व बाबींवर महसूल प्रशासनाचाच आशीर्वाद असल्याचे बोलले जात आहे. महसूल प्रशासनातील मोहरा रेती तस्करांना वाव देत असल्याने तस्करांचे धागे दोरे दूरवर पोहोचले आहेत. त्यामुळे या रेती तस्करावर कुठलीही मोठी कारवाई होताना दिसून येत नाही. म्हणून या संबंधित रेती तस्करांवर महसूल मंत्रीच आता लगाम लावतील का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
