वरोरा - चिमूर उपविभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाची माल-सुताव वसुली राम-टेके कडे !



वरोरा - चिमूर उपविभाग राज्य उत्पादन शुल्क विभागाची माल-सुताव वसुली राम-टेके कडे !


दिनचर्या न्यूज:-
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे उपविभागीय कार्यालय चिमूर येथे एका खाजगी घरी किरायाच्या घरात या कार्यालयाची खाली बोर्ड पडलेल्या अवस्थेत या विभागाचं कार्यालय प्रस्थापित आहे. सूत्राच्या माहितीनुसार या कार्यालयाचे भाडे सुद्धा वसुलीच्या माध्यमातूनच जमा करून भरले जात असल्याची नागरिकात चर्चा आहे. परंतु आमच्या माहितीनुसार शासनाकडूनच घरभाडे भरले जात आहे असे वाटते!! खरे की खोटे! हे त्या विभागातील चौकशी अंतिम समोर येईल?
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अधिकारी म्हणून

मोहतकर डोलारा सांभाळतात. दोन उपनिरीक्षक म्हणून त्यांच्या अधिपत्याखाली उप निरीक्षक अधिकारी तालुका निहाय उपनिरीक्षक म्हणून येरपुडे, गवळी, हे कार्यभार सांभाळतात. तर काही अंमलदार म्हणून या ठिकाणी कर्मचारी काम करतात. असे असताना सुद्धा या परिसरातील परवानधारक, अवैद्य दारू विक्री करणारे, तसेच परिसरात अवैध्य दारूचा पुरवठा करणारे यांची वसुली करण्यासाठी राम-टेके फंटाराची नियुक्ती केली आहे. तसेच या विभागात दोन पुन्हा फंटर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी नेमणूक केली आहे. महीना भरला की, या फंटारांची परवान धारकांकडे वसुलीसाठी तगादा , लगबग चालू होते. तारखेच्या आत ठरलेला हप्ता या फंटाराकडून वसूल केल्या जात असल्याची विश्वसनीय सूत्राकडून माहिती समोर येत आहे. कितीही माध्यमाने बातम्या लावल्या तरी आमचे काही वाकडे होऊ शकत नाही, या भ्रमात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यापासून, या वसुलीबाज फंटारांकडून बोलल्या जात असते.चंद्रपूर जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा - चिमुर डिव्हिजन मध्ये शहरी भागापासून ते ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यात बिनधास्त अवैद्य दारूच्या धंद्याचे मोठ्या प्रमाणात पेव फुटले आहेत. मग या दोन विभागांमध्ये शेकडो राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिनस्त असलेले आस्थापन बार, वाईन शॉप, देशी विदेशी दारू दुकानाचे तसेच बिअर शॉपी चे मन मर्जीने नियम धाब्यावर ठेवून अनेकांना लायसन प्राप्त झाले आहेत. अशा लायसनधारकाकडून तसेच अवैद्य दारू विक्रेत्याकडून महिन्याला हप्ता वसुली करण्यासाठी राम -टेके खाजगी वसुलीबाजाला विभागातील अधिकाऱ्यांनी नेमणूक केलीआहे. या फंटाराकडून डिव्हिजन मधील वसुलीचे काम दिले गेले आहेत. महिन्याकाठी लाखोची वसुली करणाऱ्या फहंटरवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नवनिर्वाचित पहिल्या महिला मंत्री सुनिता पवार,विभागाचे पोलीस अधीक्षक यांनी चौकशी करून कारवाई करतील का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहेत.