कोरपन्यात 'खंडणीखोर' व्हाईट कॉलर टोळीचा उपद्र ; बांबू तट्टे विकणाऱ्या 'भामट्या'ची राजकीय मुजोरी!




कोरपन्यात 'खंडणीखोर' व्हाईट कॉलर टोळीचा उपद्र ;
बांबू तट्टे विकणाऱ्या 'भामट्या'ची राजकीय मुजोरी!

दिनचर्या न्यूज:-
​कोरपना (विशेष प्रतिनिधी):
शांत असलेल्या कोरपना शहराला सध्या एका 'व्हाईट कॉलर' टोळीने उपद्रचा विळखा घातला आहे. जंगलातील बांबूचे तट्टे विकून गुजराण करणारा आज राजकीय वरदहस्ताने 'खंडणी बहादूर' झाला आहे, तर दुसरीकडे रेती तस्करीच्या माध्यमातून 'अभय' नावाचे जाळे शहराला पोखरत आहे. या टोळीने आता मर्यादा ओलांडली असून, कार्यक्रमांच्या नावाखाली लुटण्याचा सपाटा लावला आहे.
रेती तस्करीचा 'हायवा' आणि दहशतीचा 'ट्रॅक्टर'!
​या टोळीत 'पवन' आणि 'अभय' या नावांची सध्या मोठी चर्चा आहे. रेती तस्करीच्या माध्यमातून स्वतःचे 'हायवा' आणि 'ट्रॅक्टर' उभे करणाऱ्या या जोडगोळीने महसूल विभागाला खिशात घातल्यासारखी त्यांची वागणूक आहे. पैशासाठी कोणत्याही थराला जाणारी ही टोळी कोरपना शहराच्या शांततेसाठी 'कॅन्सर' ठरत आहे.
"आता पोलीस अधीक्षकच बँड वाजवणार!"
​नागरिकांचा संयम आता सुटला आहे. ही केवळ गुंडगिरी नसून कोरपना शहराची लूट आहे. या टोळीच्या विरोधात पुरावे जमा झाले असून, पोलीस अधीक्षक (SP) यांच्याकडे लवकरच 'तडाखेबाज' तक्रार नोंदवली जाणार आहे. या तक्रारीत या टोळीच्या अवैध धंद्यांचे कच्चे चिट्ठे आणि खंडणीसाठी केलेल्या तोडफोडीचे पुरावे जोडले जाणार आहेत.
जनतेचा संतप्त सवाल: "कायद्याचा धाक उरला नाही का? राजकीय आश्रय मिळाला म्हणजे शहरात खंडणीखोरी करायचा परवाना मिळाला का?" अशा विविध चर्चा आता गावात होत आहेत.
​या टोळीच्या म्होरक्याचे आणि त्यांच्या साथीदारांचे 'काऊंटडाऊन' आता सुरू झाले आहे. कोरपन्यातील सुज्ञ नागरिकांनी आता या भामट्यांविरुद्ध एल्गार पुकारला असून, लवकरच या टोळीची 'फिल्डिंग' पोलीस प्रशासनाकडून लावली जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
​"बांबू तट्टे विकणारा जेव्हा खंडणीखोर होतो, तेव्हा कायद्याचा बडगा कसा पडतो, हे येणारा काळच ठरवेल!"