राज्य सरकारने लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने केलेली शिफारस/परवानगी नाकारण्यात यावी- बंडू धोतरे
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर वन्यजीव पर्यावरणासाठी घातक ठरण्याची शक्यता असलेल्या लोहार डोंगरी लोह खनिज प्रकल्प प्रस्तावित असलेल्या प्रकल्प बाबत वेगळी अफवा होत असून या लोहार डोंगरी लोखंड प्रकल्पाची राज्य वन जीव सल्लागार मंडळाने केलेली शिफारस व परवानगी नाकारण्यात यावे यास 16 मागण्या घेऊन इको प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे मागील दहा दिवसापासून अन्नत्याग सत्याग्रहावर बसले आहेत. परंतु शासन दिशाभूल करून प्रशासनामार्फत
आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत शासन कडून देण्यात आलेले पत्रानुसार उपोषण मागे घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे, यात नमूद
“राज्य वन्यजीव मंडळाच्या दिनांक ०६.०१.२०२६ रोजीच्या बैठकीत उक्त खाण प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे विविध अटी व शर्तीच्या आधारे शिफारशीत करण्यात आले आहे. तथापि, सदर प्रकल्पाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यास याव्दारे तुर्तास स्थगिती देण्यात येत आहे.” असे कोरडे पाषाण आश्वासन देत आहे. मुख्य मागणी यानुसार ‘तूर्तास स्थगिती’ हे आश्वासन असू शकत नाही. यावेळी आम्ही आमची प्रमुख मागणी नुसार ‘लोहारडोंगरी लोह खाण प्रकल्पाची राज्य वन्यजीव सल्लागार मंडळाने केलेली शिफारस/परवानगी नाकारण्यात यावी’ या मागणी नुसार पत्रात उल्लेख असावा अशी मागणी करण्यात आली आहे. त्यानुसार आश्वासन मिळण्याची आंदोलकांना अपेक्षा आहे. असे आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले की, लोह खनिज प्रकल्प प्रस्थापित आहे.
सरकारने राज्य वन्यजीव शिफारस /परवानगी दिलेली नाकारण्यात यावी ,
तर आम्ही आमचे उपोषण मागे घेऊ, असे बंडू धोत्रे यांनी स्पष्ट केले.
यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मा. जिल्हाधिकारी, मा. मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूर वनवृत्त यांचेशिवाय आंदोलकांच्या या शिष्टमंडळत स्वतः बंडू धोतरे, प्रा योगेश दुधपचारे, अभय बडकेलवार, किशोर जामदार, अब्दुल जावेद उपस्थित होते.
