स्थायी समिती सभापती पदासाठी 'ईश्वराच्या' खेळीने दोघात कोणाचे नशीब उघडणार?


स्थायी समिती सभापती पदासाठी 'ईश्वराच्या' खेळीने दोघात कोणाचे नशीब उघडणार?

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :-

चद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी 16 मार्च रोजी निवडणूक होणार असून 13 मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मनस्वी संदीप गि-हे चे यांचे दोन अर्ज तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे वसंत राजेश्वर देशमुख यांचा १ अर्ज प्राप्त झाला आहे.
महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीनंतर जवळपास दीड महिन्याच्या विलंबाने स्थायी समिती सभापतीची निवडणूक 16 मार्चला होणार आहे. सत्ताधारी पक्षाकडे, आणि काँग्रेस समर्पित पक्षाकडे 16 स्थायी समिती सदस्य पैकी, दोन्ही राजकीय पक्षाकडे आठ -आठ सदस्य होत असल्याने
स्थायी समिती सभापती पदासाठी 'ईश्वराच्या' खेळीने दोघात कोणाचे नशीब उघडणार? की कुणाचा हुकमी एक्का चालेल, असे चंद्रपूरनगर वाशियाकडून
भाकीत वर्तवल्या जात आहे.
स्थायी समिती सभापती पदासाठी सोमवार १६ मार्च रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. सभेची सुरुवात झाल्यानंतर नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येईल. वैध नामनिर्देशन पत्रे दाखल केलेल्या उमेदवारांना नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे. जर एकापेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले, तर मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येऊन त्यानंतर निकाल जाहीर करण्यात येईल.
या बैठकीस महानगरपालिकेचे सर्व स्थायी समिती सदस्य उपस्थित राहणार असून निवडणूक प्रक्रिया नियमानुसार व पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.