चंद्रपुरात काँग्रेसकडून एलपीजी गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किंमती विरोधात निषेध आंदोलन
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे आधीच कठीण झाले असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एलपीजी गॅसच्या किंमती वाढवून पठाणी लुट करत आहे. चंद्रपुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोदी सरकारच्या विरोधात निषेध नोंदवण्यात आला.
डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली युपीए सरकारने आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किंमती वाढल्या तरी त्याचा बोजा सामान्य जनतेवर पडू दिला नाही, सबसीडी देऊन जनतेला महागाईचे चटके बसू दिले नाहीत. युपीए सरकारच्या काळात घरगुती सिलेंडर ४०० रुपयांना मिळत होते. आता एका गॅस सिलेंडरसाठी ९६० रुपयांपेक्षा जास्त मोजावे लागत आहेत. सिलेंडर बुक करण्याचा कालावधीही १५ दिवसावरुन एक महिन्याचा करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीही १९०० रुपयावर गेल्या आहेत तसेच या सिलेंडरचे रेशनिंग करण्यात येत आहे. याचा मोठा फटका विद्यार्थी, कामगार, नोकरदार, ज्यांची घरच्या जेवण्याची सोय नाही अशा लोकांना बसत आहे. शिक्षण,
नोकरी, व्यवसाय वा व्यापारासाठी मोठ्या संख्येने लोकांना बाहेर जेवण करावे लागते. व्यावसायीक गॅसच्या किंमती वाढवल्याने व त्याचे रेशनिंग केल्याने या खाद्यपदार्थाचे भावही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
गॅसची टंचाई नाही असे सरकार सांगत असले तरी वस्तुस्थिती वेगळी आहे. सर्वसामान्य जनता तसेच हॉटेल्स, खानावळी, खाद्य पदार्थ बनवणारे व बनवून विकणारे छोटे व्यावसायीक या सर्वांना गॅस सिलेंडर विना अडथळा सहजपणे उपलब्ध होईल याची व्यवस्था करावी. सरकारने वाढलेल्या किमती तात्काळ कमी कराव्यात यासाठी गांधी चौकात सिलेंडरची विधिवत पूजा करून चंद्रपूर शहर काँग्रेस कमिटी द्वारा मोदी सरकारचा विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष संतोष लहामगे, माझी महापौर संगीता अमृतकर, नगरसेवक घोटेकर, अश्विनी खोब्रागडे, यास काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
