९ मार्चपासून भिवकुंड येथे अखंड ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन सोहळा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिवकुंड येथे
मागील वीस वर्षापासून ॐ डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन सोहळा आयोजित करण्यात येत असते. यावर्षी सुद्धा सोमवार दिनांक ९ मार्च २०२६ पासून ते सोमवार दिनांक १६ मार्च २०२६ पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन सोहळा संपन्न होत आहे. ग्रंथराज ह. भ .प. श्री जीवन महाराज थेरे (आळंदी देवाची)कार्यक्रमातील प्रवचनकार यांच्या हस्ते काकडा व हरीपाठ संच व संगीतमय साथ तसेच काल्याचे किर्तन सोमवार दिनांक १६ मार्च सकाळी दहा वाजता यांच्या हस्ते होणार आहे.
सोमवार ९ मार्चला सकाळी साडेसहा वाजता घटस्थापना, प्रार्थना व हरिपाठ, दिप उत्सव व दिंडी सोहळा, भजन मंडळ, संत दर्शन, इत्यादी दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
घटस्थापना किशोर महाराज जामुनकर, डिमेशराव गाठे यांच्या हस्ते होणार असून हवन व झेंडा पूजन श्री जोशी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.
दररोज सकाळी व सायंकाळी ज्ञान व प्रार्थना ह भ प पुंडलिक महाराज इखार, गजानन फाले, नथ्थुजी सातपैसे यांच्या शुभहस्ते होणार आहेत. सात दिवस वेगवेगळे प्रवचनकार प्रवचन करणार आहेत.
प्रत्येक दिवशी सकाळी अल्पोहार आणि एकादशीचा फराळ , तसंच अन्नदात्यांकडून दर दिवशी आपले सहकार्याचे योगदान असणार आहेत.या कार्यक्रमात आमडी (बे.), खेक, कोरा, पेरखेडा, दसोडा, धामनगांव, सिल्ली, रंगाबोडी, खानगांव, माकोना, वाहनगांव, खापरी बोधली, खडसंगी, सावरी व परिसरातील समस्त जनता जनार्धन मंडळी परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन ॐ डोमनशेष महाराज सिद्धेश्वर मंदीर समिती, भिवकुंड यांच्याकडून करण्यात येत आहे.
कथा सप्ताहात येताना नागरिकांना नशापाणी करुन येण्यास सक्त मनाई आहे. असे मंदिर समितीच्या वतीने कळविण्यात येत आहे.
