जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आझाद गार्डन येथे वन विभागाकडून जलपात्राचे वितरण




जागतिक वसुंधरा दिनानिमित्त आझाद गार्डन येथे वन विभागाकडून जलपात्राचे वितरण
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर शहरातील उन्हाचा पारा 43 डिग्री सेल्सिअस चा वर तापत आहे. अशातच वनप्राणी व पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावं लागतं. म्हणून चंद्रपूर वन विभागाच्या तर्फे शहरातील मध्यभागी असलेल्या आझाद गार्डन येते
जागतिक वसुंधरा दिनानिमित्य चंद्रपूर वनविभागातर्फे कडक उन्हामुळे पक्षांना पाणी उपलब्ध करून देण्यासाठी वनविभागाव्दारे मातीच्या जलपात्रांचे वितरण करण्यात आले. वन विभागाकडून शहरातील पर्यावरण सामाजिक संस्था, व सकाळी बगीच्यात येणाऱ्या नागरिकांना मातीच्या जलपात्राचे वितरण करण्यात आले. वनविभागाकडून जवळपास 2000 मातीचे जलपात्रे पक्षांना पाणी पिण्यासाठी वाटप करण्यात येत असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी दिली. एवढेच नाही तर प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरी पक्षासाठी पाण्याची व्यवस्था करावी असे आव्हाने केले.
यावेळी चंद्रपूरचे विभागीय वनाधिकारी तलमले, सहवनाधिकारी तलमले, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व विविध पर्यावरण व सामाजीक संस्थांचे पदाधीकारी उपस्थीत होते.