महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयात अधिकारीच असतात वास्तव्याला !!
शासनाला घर भाड्याच्या नावावर लाखोचा चुना !
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्ह्यातील नामवंत असलेल्या महाराष्ट्र प्रदूषण नियम मंडळ चंद्रपूर प्रादेशिक कार्यालय, उपप्रादेशिक कार्यालय चंद्रपूर येथे मागील एक वर्षापासून या कार्यालयात कर्तव्यावर असलेले फिल्ड अधिकारी, लॅब कर्मचारी रात्री मुक्कामाने असतात. हा प्रकार अनेक वर्षापासून सुरू असून, शासनाचा घर भाड्याच्या नावावर हे अधिकारी पैसे उकळत असतात. मात्र ते राहतात आपल्या कार्यालयातच त्यामुळे त्यांना येतील एसी, संबंधित विभागातीलच लाईट,पाणी आणि इतर साहित्य वापरण्यात मिळत असल्याने या अधिकाऱ्यांना नाममात्र रूम असल्याचे भासवत असल्याचे दाखवतात. कारण दर महिन्याला घर भाड्याच्या नावावर या विभागातील अधिकारी इथेच मुक्कामाला असताना शासनाच्या लाखो रुपयाला चुना लावतात. यापूर्वीही या विभागात लाखो रुपयाच्या इलेक्ट्रिक बिलाची चौकशी प्रकरण समोर आले होते. त्यात अंदाजे 56 लाखापर्यंत भुदंड संबंधित विभागावर बसला होता. आताही महिन्याला या विभागातील विद्युत बिलाचा खर्च दोन ते तीन लाखापर्यंत विनाकारण रात्रीच्या मुक्कामाने असल्याने शासनाला भू दंड बसत असतो. म्हणून या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून यांच्याकडून वर्षभराचा खर्च शासनाने वसूल करावा.
सूत्राच्या माहितीनुसार या विभागातील दोन अधिकारी या कार्यालयात रात्री कधी कधी सुट्टीच्या दिवशीही इथेच बस्तान मांडून राहतात. येथील सर्व साहित्याचा, पाणी ,लाईट, एसी,यांचा वापर करून शासनाला दर महिन्याला लाखोचा चुना लावतात. मात्र आपले घर भाडे बरोबर उचलत असतात. अशी माहिती सूत्राकडून मिळाली. या संबंधित विभागाची चौकशी जिल्हाधिकारी यांच्या तर्फे चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी. व या कार्याला त्रास असलेल्या अधिकाऱ्याकडून आत्तापर्यंत झालेल्या खर्चाची वसुली करावी अशी मागणी चंद्रपूरकरांकडून आता होत आहे.
मागील काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या प्रदूषणा संदर्भात माहिती घेण्यासाठी प्रदूषण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दौरा केला.
प्रदूषणा संदर्भात विविध ठिकाणी पाहणी करून माहिती घेतली. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. एवढेच नाही तर चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, वित्त व वन मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी येथील अधिकाऱ्यासंदर्भात रामनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याकरिता तक्रार दिली .
एवढा गंभीर विषय असताना सुद्धा या विभागातील अधिकारी आपल्याच कार्यालयात वास्तव्य करून शासनाच्या लाखो रुपयाला चुना लावतात. प्रदूषण विभागातील या अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी. व होणारी नुकसान भरपाई वसूल करावी! अशी मागणी आता होत आहे.
