उदयकुमार पगाडेची "द रियल सुपर हिरोस -2020" या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड

उदयकुमार पगाडेची "द रियल सुपर हिरोस -2020" या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड*

*ब्रम्हपुरी:- दिनचर्या न्युज

*स्टार टीव्ही परिवारातर्फे फॉर एव्हर स्टार इंडिया अवार्ड, दिल्ली.या संस्थेमार्फत ब्रम्हपुरी येथील सामाजीक कार्यकर्ता उदयकुमार सुरेश पगाडे यांची "द रियल सुपर हिरोस-2020" या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.*
संपूर्ण भारत देशात विविध सामाजीक उपक्रम राबविल्याबद्दल राष्ट्रीय स्तरावर दिल्लीच्या फॉर एव्हर स्टार इंडिया अवार्ड या संस्थे द्वारे दरवर्षी सन्मानीय व्यक्तींना पुरस्कार दिल्या जातो. या वर्षी कोरोना लॉकडाऊन मध्ये विशेष सामाजीक कार्य करणाऱ्या व्यक्तींनाच त्यांचे आनलाईन कार्य परिचय मागवून त्यांचा सदर पुरस्काराने सन्मान करण्याचा मानस संस्थेने ठेवला होता. दरम्यान सदर पुरस्कारासाठी ब्रम्हपुरी येथील सामाजीक कार्यकर्ता उदयकुमार सुरेश पगाडे यांची आतापर्यन्त च्या सर्व पुरस्कार्थी पैकी सर्वात कमी वयाचे व्यक्तीला *द रियल सुपर हिरोस-2020* या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार मुंबई येथील भव्य सोहळ्यात त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.सदर पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात आले आहे.