सावली वनपरिक्षेत्रात वाघाने घेतला गुराख्याचा बळी




सावली वनपरिक्षेत्रात वाघाने  घेतला गुराख्याचा बळी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्रात येत असलेल्या
नील सनी पेडगाव येथील गुराखी वासुदेव लक्ष्मण वाकुडकर वय 68 वर्ष यांना वाघाने ठार केल्याची घटना दिनांक 16/8/2026 वेळ: 12.30 वा. समोर आली.
वासुदेव हा नेहमीप्रमाणे सकाळी आपले जनावरे घेऊन गावाशेजारी असलेल्या जंगल उपक्षेत्र व्याहाड, नियत क्षेत्र उपरी येथे जनावरे चारण्यासाठी घेऊन गेला होता. धब्बा धरून बसलेल्या वाघाने गुराख्यावर हल्ला चढवला. त्या वाघाच्या हल्ल्यात वासुदेव याचा बळी गेला. वन विभागाला याची माहिती होताच वनपरिक्षेत्र अधिकारी त्यांची चमु घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाचा पंचनामा करून पुढील तपास विभागाचे अधिकारी करीत आहेत.