चंद्रपुरातील डॉक्टरांकडून होतोय ‘कट’चा व्यवसाय? आरोग्य क्षेत्रात रुग्णांची कथित लूट; शहरी,ग्रामीण भागात ‘पीआरओ’च्या माध्यमातून डॉक्टरांचा धंदा ?


चंद्रपुरातील डॉक्टरांकडून होतोय ‘कट’चा व्यवसाय?


आरोग्य क्षेत्रात रुग्णांची कथित लूट; शहरी,ग्रामीण भागात ‘पीआरओ’च्या माध्यमातून डॉक्टरांचा धंदा ?

दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर : जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात रुग्णांच्या रेफरलच्या नावाखाली कथितपणे ‘कट’ घेण्याचा प्रकार सुरू असल्याची चर्चा होत आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातील काही रुग्णालये व दवाखान्यांमधून रुग्णांना विविध तपासण्या करण्यासाठी मोठ्या निदान केंद्राकडे पाठविले जात असल्याचे सांगितले जात असून, या प्रक्रियेत काही मध्यस्थ किंवा ‘पीआरओ’ सक्रिय असून डॉक्टरांना कट्सचे आमिष दाखवून सर्रास रुग्णांना ठराविक निदान केंद्रातच तपासणीसाठी पाठवले जातात.
रेडिओलॉजी विभाग' (Radiology Department) किंवा 'निदान केंद्र' / 'डायग्नोस्टिक सेंटर' (Diagnostic Centre) विविध आजारासाठी तपासणी साठी रुग्णांना विशिष्ट निदान केंद्रात पाठवण्यासाठी 'कट' दिला जातो. समजा एखाद्या डॉक्टरांनी रुग्ण तपासणीसाठी त्याची फी, ठरल्यानुसार घेतात. परंतु रुग्णांना एखाद्या निदान केंद्रात तपासणीसाठी पाठवल्यास त्याला त्याचा 'कट' डबल मिळतो. या फायद्यासाठी अनेक शहरातील डॉक्टर ठरलेल्या निदान केंद्रातच रुग्ण रेफर करत असतात.
ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयांमध्ये रेफर करण्यासाठी काही डॉक्टरांशी दलालांच्या माध्यमातून संपर्क साधला जातो आणि त्याबदल्यात कमिशन किंवा ‘कट’ दिला जात असल्याचा आरोप नाव न सांगण्याच्या अटीवर सुज्ञ नागरिकांनी आपली आप भीती माध्यमातून सांगितली.
मात्र, या आरोपांची अधिकृतपणे पुष्टी झालेली नसली तरी अशा होत असलेल्या व्यवहाराला नाकारताही येत नाही! कारण शहरात विशिष्ट अशा ठराविक डॉक्टरांकडून अशा प्रकारची सर्रास रुग्णाची लूट होत असते. अनेकदा डॉक्टर आणि रुग्णातील बिलातील तपावत आणि तपासण्या यामध्ये नेहमीच वाद होताना आपल्याला दिसून येते.
शासकीय रुग्णालयात तर , रुग्णाला रेफर करण्यासाठी सर्रास दलाल बसून आहेत. डॉक्टर शासकीय रुग्णालयात नोकरी करीत असताना स्वतःचे खाजगी दवाखाने उघडून बसले आहेत. त्या ठिकाणी हे दलाल रुग्णांना रेपर करत असल्याचा प्रकार सर्रास दिसून येते. शासकीय रुग्णालयातील निदान केंद्रातील अनेक मशीन बंद असल्याचा आहावा करीत असतात. याचाच फायदा घेऊन बाहेरील निदान केंद्रात 'कट 'मिळत असल्याने रुग्णांना  रेपर करीत असल्याचा सर्रास आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे.


अनावश्यक तपासण्यांचा प्रश्न? 

रुग्णाला नेमकी कोणती तपासणी आवश्यक आहे, कोणत्या रुग्णालयात उपचार घ्यावेत आणि त्यासाठी किती खर्च अपेक्षित आहे, याबाबत पारदर्शक माहिती मिळणे हा रुग्णाचा अधिकार आहे. मात्र, कमिशनच्या व्यवहारामुळे अनावश्यक तपासण्या किंवा महागडे उपचार रुग्णांवर लादले जात असतील, तर हा गंभीर आरोग्यविषयक प्रश्न ठरू शकतो.

आरोग्य विभागाने चौकशी करावी

चंद्रपूर जिल्ह्यात अशा प्रकारचे मध्यस्थ कोण आहेत? कोणत्या रुग्णालयांमध्ये रुग्ण रेफरलचे व्यवहार होतात? डॉक्टरांना किंवा मध्यस्थांना कट  दिले जाते का? रुग्णांना आवश्यकतेपेक्षा अधिक तपासण्या करण्यास भाग पाडले जाते का? रुग्णांना औषधी खरेदी करताना बंधन घातल्या जातात का?या सर्व बाबींची आरोग्य विभागाने स्वतंत्रपणे चौकशी करण्याची मागणी होत आहे.

रुग्णांच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही निर्णयामध्ये आर्थिक व्यवहाराला प्राधान्य न देता वैद्यकीय गरज आणि रुग्णहिताला प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे या आरोपांची वस्तुनिष्ठ चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.