चिचपल्ली येथे 'स्वच्छता ही सेवा' व 'सेवा संकल्प' अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ
चंद्रपूर:
ग्रामपंचायत चिचपल्ली आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिचपल्ली येथे आज, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता 'स्वच्छता ही सेवा' आणि 'सेवा संकल्प' अभियानाचा तालुकास्तरीय शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. स्वच्छता हि सेवा अभियान कालावधी 17 सप्टेबर २०२6 ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत राबवण्यात येणार आहे.
पंचायत समिती चंद्रपूरच्या गट विकास अधिकारी मा. श्रीमंती संगिता भांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाला सहायक गट विकास अधिकारी मा. श्री. पाल, गट शिक्षण अधिकारी श्री. यादव साहेब, विस्तार अधिकारी (पंचायत) श्री. यारेवार, विस्तार अधिकारी (पंचायत) कु. मिनाक्षी बन्सोड, जि. प. चंद्रपूरचे स्वच्छता समन्वयक श्री. खानझोडे साहेब आणि तालुका स्वच्छता व्यवस्थापक आशिया शेख, किसन आकुलवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, तालुकास्तरीय कर्मचारी व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी हे अभियान तळागाळापर्यंत पोहोचवून परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी स्वच्छतेची सामूहिक शपथ घेतली.
विविध उपक्रमांचे आयोजन:
शुभारंभाच्या प्रसंगी प्राथमिक आरोग्य केंद्र चिचपल्ली येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवून साफसफाई करण्यात आली. तसेच नागरिकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी रांगोळी स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या तालुकास्तरीय कार्यक्रमाला तालुका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
