एकनाथ कन्नाके यांची हत्या की आत्महत्या?
शव चंद्रपूर बल्लारपूर रोडच्या जंगलात झाडाला लटकलेले आढळून आले.
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
आदिवासी समाजातील धडाडीचे नेता म्हणून एकनाथ कन्नाके कडे पाहायला जात होते. सर्वांना एकत्र आणण्याची, एवढेच नव्हे तर नवनवीन उद्योगात समरस होण्याची त्यांची खाती होती. पोलीस विभागातून रजा घेतल्यानंतर त्यांनी आपला संपूर्ण वेळ समाजकार्यात देत असत. अशा या एकनाथ कन्नाके यांचे अकस्मात जाणे हे समाजाला वेदनादायी आहे.
निवृत्त पोलिस अधिकारी, आदिवासी समाजाचे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा चंद्रपूर चे महासचिव मा. एकनाथजी कन्नाके यांचे दुखःद निधन झाल्याचे वृत्त आहे. त्याचे पार्थिव बल्लारपूर चे जंगलात झाडाला लटकलेले आढले. ही आत्महत्या की घातपात हे शव विच्छेदन झाल्यानंतरच कळेल.
एका हसमुख व प्रेमळ सहकार्याच्या निधनाची बातमी वेदनादायक आहे.
त्यांच्या मागे पत्नी मुले मोठा आप्त परिवार आहे. त्यांना ईश्वर या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो.हीच प्रार्थना
भावपूर्ण आदरांजली.