राज्यातील 27 डीसीपी, एस पी, पोलीसअधिकाऱ्यांच्या बदल्या होणार !





राज्यातील 27 डीसीपी, एस पी,या पोलीसअधिकाऱ्यांच्या बदल्या होणार !

दिनचर्या न्युज
चंद्रपूर :-
राज्यात स्थायी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या आचारसंहिता अगोदर राज्यात पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तातडीने गृहमंत्रालयाकडून वर्षा बंगल्यावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संदर्भाची फाईल मागितल्याची चर्चा होत आहे.
त्यात राज्यातील 27 डीसीपी व एस पी अशा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून चंद्रपूर पोलीस अधीक्षक, गडचिरोली पोलीस अधीक्षक, व भंडारा येथील पोलीस अधीक्षक यांची बदली होत असल्याची पोलीस विभागातील सूत्राच्या माहितीनुसार बदली संदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे.