काँग्रेस अंतर्गत गटबाजीचा वाद आता जीव घेण्याहल्ल्यापर्यंत! chandrapur



काँग्रेस अंतर्गत गटबाजीचा वाद आता जीव घेण्याहल्ल्यापर्यंत!

वर्धा समृद्धी महामार्गावरील घटना !

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत नसल्याने बहुमताचे आकडे जुळवण्यात काँग्रेस, भाजपाकडून महापौर आमचाच बनेल असे दावे केले जात आहेत . काँग्रेसमध्ये विधी मंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे.
गेल्या काही दिवसापासून काँग्रेसचे वडेट्टीवर समर्थक काही नगरसेवकासह पुणे येथे तळ ठोकून होते. जानेवारी 29 तारखेला सकाळी पावणे सहा वाजता परतीच्या प्रवासात असताना समृद्धी मार्गावर जवळपास 25 ते30 तरुणाच्च्या टोळक्याने ट्रॅव्हल्स थांबवून अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत शस्त्र दाखवून जीवे जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी
सावंगी (मेघे) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हल्लेखोरा पैकी एकाला अटक केली असून बाकी हल्लेखोर फरार असून त्याच्या शोध पोलीस घेत आहेत या घटनेने काँग्रेस अंतर्गत वर्तुळातील वादाने चांगलीच खळबळ माजली आहे.
काँग्रेसचे वडेट्टीवार समर्थक नगरसेवक पुण्यावरून येत असल्याची माहिती धानोरकर गटातील समर्थकांना मिळाली. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 60/ 600 जवळ वर्धा पासून काही अंतरावर असलेल्या समृद्धी महामार्गावर चार चाकी वाहनातून आलेल्या जवळपास 25 30 हल्लेखोरांनी नगरसेवकाच्या ट्रॅव्हल्स ला थांबवून अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या घटनेमुळे ट्रॅव्हल्स मध्ये असलेल्या सर्व नगरसेवकांच्या कुटुंबीयांमध्ये भीती पसरली जीव मुठीत घेऊन सर्व कुटुंब ट्रॅव्हल्स मध्येच बसून होते. वेळीच गस्तीवर असलेले पोलीस आले नसते तर हा वाद एखाद्यावर जीवघेणा ठरला असता. या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार सौरभ ठोंबरे याने ट्रॅव्हल्स मध्ये चढून सर्व नगरसेवकांना आमच्या सोबत या अशी धमकी दिली. मात्र कुणीही नगरसेवक त्याच्या धमकीला दात दिली नाही ट्रॅव्हल्स मध्ये जोरदार र*** झाला.
 या प्रकरणाची नगरसेवक राजेश  अडुळ यांनी सावंगी मेघे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. 
 त्यांच्या तक्रारीवरून सौरभ अरूण ठोंबरे (विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर), कनेन शमीम सिद्दीकी (खारखेडा, नागपूर), मुजम्मील खान (मोमीनपुरा नागपूर), जासीम खान (मोमीनपुरा नागपूर), आलोक रोहीदास (मानकापूर, नागपूर), तसेच अदनान शेख (मानकापूर नागपूर) व यांच्यासह अन्य हल्लेखोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता १२६ (२), '१८९ (२), १९०, ३५१ (३), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी घटनास्थळावरून कनेन शमीम सिद्दीकी याला पोलिसांनी अटक केली आहे. इतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलीस शोध घेत आहेत.
या घटनेमुळे चंद्रपुरातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली असून, पोलिसांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.